News Flash

करोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही- WHO

लसींचे परिणाम पाहिल्यानंतर WHO च्या संचालकांचं आशादायी वक्तव्य

संग्रहित

करोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांन केलं आहे. अनेक देशांमध्ये लसींवर काम सुरु आहे. काही ठिकाणी लसी तिसऱ्या टप्प्यातही आहेत. त्यांचे परिणाम पाहिले तर आता आपण करोना महामारी संपेल असं स्वप्न पाहण्यास हरकत नाही असं मत टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी व्यक्त केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. असं असलं तरीही जे प्रगत आणि श्रीमंत देशांनी लसीच्या आशेवर गरीब आणि मागास देशांना ठेवू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस हे या सभेत असं म्हणाले की “करोना काळात जगाने माणसाची चांगली रुपं पाहिली आहेत तशीच वाईटही रुपं पाहिली आहेत. मात्र ही महामारी संपली तरीही गरीबी, भूक आणि असमानता यामध्ये परिवर्तन होऊ शकतं हे विसरुन चालणार नाही. ”

करोना व्हायरसमुळे जगभरात अनेक लोकांचे मृत्यू झाले आहेत. तसंच संक्रमणही पूर्णपणे संपलेलं नाही त्यामुळे काळजी घ्यावी लागणार आहेच. करोनावरची लस जेव्हा येईल त्यानंतर संपूर्ण जगाला गरीबी, उपासमारी, असमानता यांच्याशीही आपल्याला लढावं लागणार आहे असंही टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे.

टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी ऑनलाइन परिषदेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी करोनाविरोधात जे लसींचं संशोधन सुरु केलं आहे त्यांचं त्यांनी कौतुकही केलं आहे. मात्र करोनावरची लस निघाली तरी अनेक देशांमध्ये ज्या मुळातल्या समस्या आहेत त्या दूर होणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. श्रीमंत आणि प्रगत देशांनी गरीब देशांना मदत करावी असंही आवाहन त्यांनी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 2:30 pm

Web Title: world can start to dream about end of the pandemic who on vaccine results scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 किम जोंग उन पुन्हा चर्चेत; करोनाचे नियम मोडणाऱ्यावर सार्वजनिक ठिकाणी झाडल्या गोळ्या
2 “हे हिंदू गद्दार…”, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आलेल्या युवराज सिंगच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य
3 अरेच्चा! ‘कोवॅक्सिन’चा डोस घेतलेल्या हरयाणाच्या आरोग्यमंत्र्यांनाच झाला करोना
Just Now!
X