11 December 2017

News Flash

जगप्रसिद्ध मूर्तिकार जसू शिल्पी यांचे निधन

‘भारताच्या कांस्य महिला’ या नावाने परिचित असलेल्या प्रख्यात मूर्तिकार जसू शिल्पी यांचे हृदयविकाराच्या तीव्र

पीटीआय, अहमदाबाद | Updated: January 16, 2013 4:36 AM

‘भारताच्या कांस्य महिला’ या नावाने परिचित असलेल्या प्रख्यात मूर्तिकार जसू शिल्पी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्य़ाने निधन झाले. त्या ६४ वर्षांच्या होत्या.
सोमवारी संध्याकाळी छातीत दुखू लागल्याने शिल्पी यांना त्यांच्या शिल्पनिर्मिती केंद्रावरून रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे त्यांचा मुलगा ध्रुव यांनी सांगितले.
कांस्य धातूपासून मूर्ती तयार करणाऱ्या कलाकार म्हणून जसू शिल्पी यांना जगभरात मान होता. त्यांनी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारही पटकावले होते. गुजरातमधील महात्मा गांधींचा पुतळा, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे शिल्पी यांनी तयार केलेले पुतळे रेखीव आहेत. याशिवाय महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, बिहार, उत्तरांचल आणि राजस्थान या राज्यांमध्येही त्यांनी तयार केलेले पुतळे बसविण्यात आले आहेत.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी २२५ मोठे तर ५२५ मध्यम आकाराचे कांस्य पुतळे घडविले. त्यांनी तयार केलेला मार्टिन ल्युथर किंग यांचा पुतळा फ्लोरिडा विद्यापीठात बसविण्यात आला आहे.

First Published on January 16, 2013 4:36 am

Web Title: world famous sculptor jasu shilpi passed away