News Flash

World Youth Skills Day 2021: युवकांचे कौशल्य आत्मनिर्भर भारताचा आधार – नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १५ जुलै २०२१ रोजी जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १५ जुलै २०२१ रोजी जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, “तरुणांच्या नव्या पिढीचा कौशल्य विकास, एक राष्ट्रीय गरज असून आत्मनिर्भर भारताचा एक खूप मोठा आधार आहे. गेल्या ६ वर्षात बनलेल्या नव्या संस्थांच्या पूर्ण ताकदीने आपल्याला स्किल इंडिया मिशनला गती द्यावी लागेल.”

“युवकांचे कौशल्य हे आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. आज कौशल्यांना जास्त मागणी आहे. जगासाठी भारताकडे स्मार्ट आणि कौशल्यवान मनुष्यबळ आहे. स्किल इंडियाचे ध्येय आपल्याला नव्याने चालवायचे आहे. कौशल्याद्वारे स्वत: आणि देशाला स्वावलंबी बनवले पाहिजे.” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा- मोदी आठ महिन्यानंतर स्वत:च्या मतदारसंघात जाणार, काशीला देणार १५८३ कोटींच्या योजना; जाणून घ्या दौऱ्याचं वेळापत्रक

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “जर शिक्षणाने आपल्याला काय करावे लागेल याची माहिती दिली तर कौशल्य आपल्याला ते कार्य वास्तविक स्वरूपात कसे केले जाईल हे शिकवते. हे सत्य जुळवण्यासाठी कौशल्य भारत मिशन हा एक कार्यक्रम आहे.”

आज लर्निंग सोबत अर्निंग देखील महत्वाचं

“कौशल्य भारत मिशन अंतर्गत आतापर्यंत अनेक युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आज लर्निंग सोबत अर्निंग देखील महत्वाचे आहे. आज जगात अशा कौशल्यांची मागणी आहे की जो कोणीही कौशल्यवान असेल तो पुढे जाईल.”, असे देखील नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 11:21 am

Web Title: world youth skills day 2021 youth skills are the basis of a self reliant india says narendra modi srk 94
टॅग : Narendra Modi
Next Stories
1 करोना रुग्णसंख्येत वाढ! ५८१ रुग्णांचा मृत्यू , ४१ हजारांहून अधिक लोक संक्रमित
2 आमच्याकडून माहिती मागवण्यात भारत आघाडीवर; ट्विटरने केला खुलासा
3 ‘या’ राज्याने आर्थिक निकषांवर दिलं १० % आरक्षण; सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक संस्थांमध्ये EWS Reservation लागू
Just Now!
X