News Flash

जगभरात करोनामुळे एक लाख २७ हजार ६३५ जणांचा मृत्यू

केवळ युरोपमध्ये १० लाख तीन हजार २८४ जणांना लागण झाली असून ८४ हजार ४६५ जणांचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र.

जगभरात करोनाची २० लाख १५ हजार ५७१ जणांना लागण झाली असून आतापर्यंत एक लाख २७ हजार ६३५ जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ युरोपमध्ये १० लाख तीन हजार २८४ जणांना लागण झाली असून ८४ हजार ४६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

स्पेनमध्ये एक लाख ७२ हजार ५४१ जणांना करोनाची लागण झाली असून १८ हजार ०५६ जणांचा मृत्यू झाला आहे तर इटलीमध्ये एक लाख ६२ हजार ४८८ जणांना लागण झाली असून २१ हजार ०६७ जणांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये एक लाख ४३ हजार ३०३ जणांना लागण झाली असून १५ हजार ७२९ जणांचा मृत्यू झाला आहे तर जर्मनीमध्ये तीन हजार २५४ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये ९३ हजार ८७३ जणांना लागण झाली असून १२ हजार १०७ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 1:16 am

Web Title: worldwide 1 lakh 27 thousand 635 people have died due to corona abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 उद्योगधंद्यांना सोमवारपासून मुभा
2 अमेरिकेकडून ‘डब्ल्यूएचओ’चा निधी बंद
3 टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी
Just Now!
X