News Flash

जमावाने मारहाण करीत मुस्लिम तरुणाला जबरदस्तीने दाढी काढायला भाग पाडले

'तू पाकिस्तानी असल्याने दाढी करायला नकार देत आहेस', असे म्हणत टोळक्याने जबरदस्तीने सलूनमध्ये नेऊन खुर्चीला बांधून दाढी करायला भाग पाडले, असे जफरुद्दीनने आपल्या तक्रारीत म्हटले

जमावाकडून मारहाण करीत जबरदस्तीने दाढी काढण्यास भाग पाडण्या आलेला मुस्लिम तरुण जफरुद्दीन हमीद युनुस.

कथित गोमांस बाळगल्याच्या संशयातून देशभरात मुस्लिमांना जमावाकडून टार्गेट केले जात असताना आता दाढी वाढवल्याच्या कारणाने एका मुस्लिम तरुणाला जमावाकडून मारहाण करीत जबरदस्तीने दाढी काढण्यात भाग पाडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. हरयाणातील गुरगाव येथे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, हरयाणातील गुरगावचा रहिवासी असलेल्या जफरुद्दीन हमीद (वय ३९) नामक तरुणाला काही लोकांनी मारहाण केली. तसेच त्याच्या धर्मावरुन शेरेबाजी करीत जबरदस्तीने दाढी काढायला भाग पाडले.

या टोळक्याने जफरुद्दीनला जबरस्तीने सलूनमध्ये नेऊन तेथील कर्मचाऱ्याला त्याची दाढी काढायला सांगितली. मात्र, कर्मचाऱ्याने असे करायला नकार दिल्याने या टोळक्याने दोघांनाही मारहाण केली. ‘तू पाकिस्तानी असल्याने दाढी करायला नकार देत आहेस’, असे म्हणत टोळक्याने जबरदस्तीने सलूनमध्ये नेऊन खुर्चीला बांधून दाढी करायला भाग पाडले, असे जफरुद्दीनने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

जफरुद्दीन हा मेवत भागातील बादली येथे राहत असून गुरगावच्या सेक्टर २९मध्ये कामाला आहे. येथेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 2:06 pm

Web Title: youth of gurugram yunus filed complaint that a couple of unidentified men forcibly shaved off his beard
Next Stories
1 नवज्योतसिंग सिद्धू जाणार इम्रान खान यांच्या शपधविधीला, राजकीय प्रवासाचे केले कौतूक
2 बलात्कार पीडित लहान मुलांचे कशाही स्वरुपातील फोटो दाखवू नये: सुप्रीम कोर्ट
3 कलबुर्गींप्रमाणेच गौरी लंकेश यांच्या डोक्यात गोळ्या घालण्याचे दिले होते आदेश
Just Now!
X