News Flash

इंटरनेट समानतेच्या विरोधात नाही-मार्क झकरबर्ग

फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झकरबर्ग यांनी सुरू केलेल्या ‘इंटरनेट डॉट ऑर्ग’ या प्रकल्पावर टीकेचा भडिमार सुरू असतानाच ही योजना असंख्य लोकांसाठी कशी फायद्याची आहे, हे समजाविण्याचा

| April 18, 2015 03:49 am

फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झकरबर्ग यांनी सुरू केलेल्या ‘इंटरनेट डॉट ऑर्ग’ या प्रकल्पावर टीकेचा भडिमार सुरू असतानाच ही योजना असंख्य लोकांसाठी कशी फायद्याची आहे, हे समजाविण्याचा प्रयत्न झकरबर्ग यांनी सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे इंटरनेट समानतेला बाधा निर्माण होईल, अशी सार्वत्रिक टीका केली जात आहे. मात्र झकरबर्ग यांनी ही टीका चुकीची असून, ‘इंटरनेट डॉट ऑर्ग’ हा प्रकल्प इंटरनेट समानतेच्या विरोधात नाही, असे सांगितले. इंटरनेट समानतेच्या पुढाकारासाठीच या प्रकल्पाद्वारे काही सेवा ग्राहकांना मोफत दिल्या जाणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
‘इंटरनेट डॉट ऑर्ग’ या प्रकल्पाचा फायदा भारतातील लाखो लोकांना होणार आहे. या प्रकल्पामुळे अनेक इंटरनेट संकेतस्थळे एकाच छत्राखाली येणार असून, त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल, असे झकरबर्ग यांनी सांगितले.
 ‘इंटरनेट डॉट ऑर्ग’ या प्रकल्पाचा फायदा काही संकेतस्थळांनाच होणार आहे आणि अन्य संकेतस्थळांना मोठा फटका बसेल, हा आरोप चुकीचा आणि तथ्यहीन आहे, असे झकरबर्ग यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 3:49 am

Web Title: zuckerberg cant have it both ways on net neutrality
Next Stories
1 काश्मिरात फुटीरतावाद्यांचा हिंसाचार
2 चीन-पाकिस्तानमध्ये अब्जावधी डॉलर्स गुंतवणुकीचा आर्थिक मार्ग
3 ..तर पंतप्रधानांना जशास तसे उत्तर
Just Now!
X