Chaitra Ram Navami 2024 : संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेल्या भगवान रामाचा सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या मंदिराची आपण वाट पाहिली ते मंदिरही आता उभं राहिलं आहे. त्यामुळे यंदाचा राम नवमी उत्सव अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा होण्याची शक्यता आहे. दरम्यान,याच राम नवमीसाठी १ लाख ११ हजार १११ किलोचे लाडू प्रसादासाठी अयोध्येतील राम मंदिरात पाठवण्यात येणार आहेत. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

देवरा हंस बाबा ट्रस्टच्या वतीने हे लाडू अयोध्येत पाठवण्यात येणार आहेत. या ट्रस्टचे अध्यक्ष अतुल कुमार सक्सेना म्हणाले, देवरा हंस बाबा ट्रस्ट १ लाख ११ हजार १११ किलोचा लाडू प्रसाद अयोध्येला पाठवणार आहे. तसंच, लाडूचा प्रसाद प्रत्येक आठवड्याला देशभरातील विविध मंदिरात पाठवला जातो. काशी विश्वनाथ मंदिर असो वा तिरुपती बालाजी असो, सर्व मंदिरात लाडू पाठवले जातात. ते पुढे म्हणाले, २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त या ट्रस्टने अयोध्येला ४० हजार किलो लाडू वाटले होते.

यंदाचा राम जन्मोत्सव खास

पाचशे वर्षांचा संघर्ष संपून अखेर अयोध्येत राम मंदिराचे निर्माण झाले आहे. २२ जानेवारी रोजी भगवान रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला. त्यामुळे यंदाचा राम जन्मोत्सव खास मानला जात आहे. रामनवमीनिमित्त जवळपास ५ लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने भाविकांची गैरसोय टाळण्याकरता विविध उपाययोजना आखल्या आहेत. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे.

हेही वाचा >> Ram Navami 2024 : १६ की १७ एप्रिल; कधी आहे रामनवमी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

कधी आहे रामनवमी?

हिंदू पंचांगनुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाला येणारी नवमीची तिथी १६ एप्रिल मंगळवार, दुपारी १ वाजून २३ मिनिटांनी सुरू होत आहे तर १७ एप्रिल दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी समाप्त होईल. अशात उदया तिथि नुसार रामनवमी ही १७ एप्रिल २०२४ ला आहे.

राम नवमी शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगमध्ये शुभ मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.रामनवमीच्या दिवशी तुम्ही रामाची पूजा सकाळी ११ वाजून १ मिनिटापासून ते दुपारी १ वाजून ३६ मिनिटांपर्यंत करू शकता. एकुण वेळ २ तास ३५ मिनिटे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय मुहूर्त- दुपारी २ वाजून ३४ मिनिटांपासून ३ वाजून २४ मिनिटांपर्यंत
गोधूलि मुहूर्त – सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपासून ते ७ वाजून ९ मिनिटांपर्यंत