चेन्नई :  आयआयटी मद्रासच्या संकुलातील १२ विद्यार्थी करोनाबाधित झाल्यानंतर, राज्याचे आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन यांनी या परिसराचे निरीक्षण करून अधिकाऱ्यांना परिसर निर्जंतुक करण्याचे, तसेच सुरक्षिततेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले.

 करोना संसर्गाचे पहिले प्रकरण १९ एप्रिलला लक्षात आले व त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी दोन विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली, असे राधाकृष्णन यांनी सांगितले. यानंतर चेन्नई महापालिका आणि आयआयटी मद्रास संकुलातील वैद्यकीय चमूने या विद्यार्थ्यांच्या निकटच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने घेतले. चाचणी होकारात्मक आलेल्यांत सौम्य लक्षणे आहेत.