येथील प्रकाशम जिल्ह्यात व-हाडींना घेऊन जाणारी बस आणि ट्रकच्या धडकेत १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातात पाचजण गंभीर जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
कांडुकूरकडून लग्नाचे वऱ्हाड गेऊन येणारी ट्रक विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनिबसवर जाऊन आदळल्याने अपघात झाल्याची माहिती असलेल्या पोलिसांनी दिली. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने अनेक जण आतमध्येच होरपळले. हैदराबादहून कंदूकूर येथे जात असलेल्या बसमधील बरेचसे प्रवाशी अलिकडील स्थानकावर उतरल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, जखमींना ओंगोले येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.