युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणण्याचे कार्य सुरूच आहे. आतापर्यंत जवळपास १३ हजार ३०० नागरिक भारतात सुखरूप परतले आहेत. मागील २४ तासांमध्ये आणखी १५ विमानांद्वारे २ हजार ९०० जण आले असून, पुढील २४ तासांसाठी १३ विमाने नियोजित आहेत. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

Russia Ukraine War Live: रशियावरील निर्बंध हे युद्धाच्या घोषणेसारखे; पुतिन यांचे मोठे वक्तव्य

importance of rest for airline pilots
विश्लेषण : वैमानिकांची विश्रांती का महत्त्वाची?
BJP spent 38 crores in online advertisements in three months
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च; ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ
Cyber Crime
कंबोडियात पाच हजार भारतीयांवर सायबर अत्याचार, ५०० कोटींची फसवणूक, सरकारकडून रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात!
national pension scheme marathi news
मार्ग सुबत्तेचा : राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस): फायदे आणि तोटे

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, मागील २४ तासांमध्ये १५ विमानं भारतात पोहचली असून, ज्यामध्ये जवळपास २९०० भारतीयांना आणलं गेलं आहे. मिशन गंगा अंतर्गत आतापर्यंत जवळपास १३ हजार ३०० भारतीयांना घेऊन ६३ विमानं भारतात पोहचली आहेत. तर, पुढील २४ तासांसाठी आणखी १३ विमानं नियोजित करण्यात आलेली आहेत. आता आपण पाहणार आहोत की युक्रेनमध्ये आणखी कित भारतीय आहेत. जे तेथे आहेत परंतु नोंदणीकृत नाहीत त्यांच्याशी दूतावास संपर्क करेल. आम्ही २९८ विद्यार्थ्यांना जवळच्या पिसोचिन येथे स्थलांतरित केले आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे.

तसेच, आम्ही येत्या काही तासांत पिसोचिन आणि खार्किवमधून सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू, असा दावाही परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. आतापर्यंत आम्हाला माहित आहे की खार्किवमध्ये कोणीही शिल्लक नाही. आता आमचे संपूर्ण आणि मुख्य लक्ष्य सुमीवर आहे. आमच्यासमोर आव्हान कायम आहे. अशी देखील परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती दिली गेली आहे.