गझनी प्रांतातील स्थानिक पोलीस तपासणी नाक्यावर बुधवारी पहाटे तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात १० पोलिसांसह १६ जण ठार झाले. याखेरीज काबूलमध्ये लष्करी बसवरही तालिबान्यांनी बॉम्बहल्ला केला.
गझनीतील कडेकोट सुरक्षा यंत्रणा भेदून अतिरेक्यांना हल्ला कसा चढविता आला, याचा शोध पोलीस घेत आहेत. या भीषण हल्ल्यामध्ये सहा गावकरीही मृत्युमुखी पडले आहेत.
दरम्यान, काबूलमधील मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या लष्करी बसवर आत्मघातकी पथकातील अतिरेक्यांनी सकाळी सव्वासातच्या सुमारास बॉम्बहल्ला केला. त्यात संरक्षण मंत्रालयाचे सहा सदस्य आणि चार नागरिक जखमी झाले.