दिल्लीच्या शाहबाद डेअरी भागात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची चाकूने आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. या CCTV मध्ये हे स्पष्ट दिसतं आहे एका माणसाने मुलीला चाकूने भोसकलं, त्यानंतर एका दगडाने तिला ठेचलं आणि तिची हत्या केली. ही घटना घडत असताना काही लोक तिथून येताना-जाताना दिसत आहेत पण कुणीही या मुलीला वाचवलं नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या माणसाने या मुलीला भोसकलं त्या दोघांमध्ये मैत्री होती. ही मुलगी तिच्या मित्राच्या वाढदिवसासाठी चालली होती. त्यावेळी या माणसाने तिला अडवलं. त्यानंतर तिच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली. या आरोपीचं नाव साहिल आहे. मुलीची हत्या करुन तो फरार झाला आहे. पोलिसांकडून या साहिलचा शोध घेतला जातो आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिलने अल्पवयीन मुलीवर चाकूने २० वार केले. त्यानंतर दगडाने ठेचून मुलीची हत्या केली. त्याने केलेले वार इतके भयंकर होते की चाकू या मुलीच्या डोक्यात अडकला. त्यानंतर बाजूला पडलेला एक सिमेंटचा मोठा दगड त्याने उचलला आणि या मुलीला ठेचून ठार केलं. त्यानंतर साहिल तिथून फरार झाला. घटना घडत असताना आजूबाजूला काही लोक होते. मात्र कुणीही या मुलीची मदत केली नाही. तसंच साहिललाही कुणीच अडवलं नाही. या दोघांचं भांडण झालं होतं असंही समजतं आहे. इंडिया टुडेने या विषयीचं वृत्त दिलं आहे.