उत्तर प्रदेशात भीषण अपघात झाला आहे. ट्रकने डबल डेकर बसला दिलेल्या धडकेत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेले सर्व मजूर असून बसच्या समोर झोपले होते. अयोध्या-लखनऊ महामार्गावर बाराबंकी येथे हा अपघात झाला आहे. काही मजूर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे. लखनऊमधील ट्रॉमा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व मजूर बिहारचे आहे. हे मजूर हरियाणामधून परतत असताना त्यांची बस मंगळवारी रात्री हायवेवर बंद पडली. यामुळे ते हायवेवरच बससमोर झोपले होते. ट्रकने बसला जोरदार धडक दिल्याने बस या मजुरांच्या अंगावर गेली आणि त्यांचा मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस बंद पडल्यानंतर चालकाने प्रवाशांना रिपेअरिंगचं काम होईपर्यंत आराम करण्यास सांगितलं होतं. यानंतर काही वेळात ट्रकने बसला जोरदार धडक दिली आणि ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी आहेत.

नरेंद्र मोदींकडून मदत जाहीर

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींना ५० हजारांची मदत केली जाणार आहे.

काही मृतदेह बसखाली अडकले असून घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18 sleeping on road dead as truck hits in uttar pradesh barabanki sgy
First published on: 28-07-2021 at 07:37 IST