दक्षिणपश्चिम पाकिस्तानातील क्वेटा शहरात प्रांत पोलीस प्रमुखाच्या घराशेजारी रविवारी सायंकाळी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात २ जण ठार झाले तर २० जण गंभीर जखमी झाले. आत्मघाती स्फोट घडवून आणणाऱ्या व्यक्तीने आपल्या शरीरावर स्फोटके बांधली होती.बलुचिस्तानचे पोलीसप्रमुख मुश्ताक सुखेरा यांच्या घराजवळ या व्यक्तीने स्फोटकांच्या मदतीने आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यात दोन जण जागीच ठार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 14th May 2013 रोजी प्रकाशित
आत्मघातकी हल्ल्यात २ ठार, २० जखमी
दक्षिणपश्चिम पाकिस्तानातील क्वेटा शहरात प्रांत पोलीस प्रमुखाच्या घराशेजारी रविवारी सायंकाळी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात २ जण ठार झाले तर २० जण गंभीर जखमी झाले. आत्मघाती स्फोट घडवून आणणाऱ्या व्यक्तीने आपल्या शरीरावर स्फोटके बांधली होती.
First published on: 14-05-2013 at 03:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 killed 20 injured in suicide attack in quetta