School teacher sexual abuse राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यात एका ५९ वर्षीय सरकारी शाळेतील शिक्षकाला अश्लील व्हिडिओ बनवल्याबद्दल आणि अल्पवयीन विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ विद्यार्थ्यांनी शिक्षक आपला लैंगिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे. आरोपी शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
नेमका प्रकार काय?
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शिक्षक दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे शोषण करत होता. शिक्षक त्यांना धमकी देत होता की जर त्यांनी पालकांना याबद्दल काहीही सांगितले तर तो त्यांना परीक्षेत नापास करेल. शिक्षकाचा एक कथित व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी या शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “तो शिक्षक नाही तर एक राक्षस आहे. त्याने त्याच्या पदाचा गैरवापर करून निष्पाप शालेय मुलांचा लैंगिक छळ केला आहे. शिक्षकावर सरकार कठोर कारवाई करेल,” असे त्यांनी सांगितले.
हे प्रकरण कसे उघडकीस आले?
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “एका विद्यार्थ्याने त्याच्या पालकांना त्याला शाळेत न पाठवण्याची विनंती केली आणि त्याची शाळा बदलण्याचा आग्रह धरला. जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी मुलाला विश्वासात घेतले आणि कारण विचारले तेव्हा त्याने शाळेत घडणार्या गैरप्रकाराविषयी सांगितले. त्यानंतर त्याच्या कुटुंबाला धक्का बदला आणि कुटुंबातील सदस्यांनी शिक्षकाच्या गैरकृत्याबद्दल गावातील रहिवाशांना माहिती दिली.”
यानंतर, शुक्रवारी सकाळी गावातील रहिवासी शाळेत पोहोचले आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला. त्यांनी शाळेला कुलूप लावण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर सरकारी अधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, २३ विद्यार्थ्यांनी शिक्षकाकडून छळ केल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांनी म्हटले, “ज्या विद्यार्थ्यांचा छळ ते विद्यार्थी सहा ते १६ वर्षे वयोगटातील आहे. शिक्षकाने विद्यार्थी आणि विद्यार्थीनी दोघांनाही त्रास दिला. त्याला अटक करण्यात आली आहे आणि आम्ही त्याच्यावर पोक्सो कायदा, एससी/एसटी कायदा, बीएनएस, आयटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांअंतर्गत त्याला कठोर शिक्षा होईल,” असेही पोलीस म्हणाले.