तामिळनाडूची राजधानी असणाऱ्या चेन्नईमध्ये एक धक्कादायक अपघात घडला. येथील पल्लीरनई परिसरामध्ये लावलेला बेकायदेशीर होर्डिंग अंगावर पडल्याने शुभाश्री नावाच्या २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षामार्फत (अण्णाद्रमुक)  लावण्यात आलेल्या बेकायदेशीर होर्डिंग शुभाश्रीच्या अंगावर पडला. त्यामुळे शुभाश्री रस्त्यावर पडली आणि मागून येणाऱ्या भरधाव पाण्याच्या टँकरखाली चिरडली गेली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिला मृत घोषित करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार शुभाश्री पल्लावरम थोरेपकम रस्त्यावरुन स्कुटीने जात होती. त्यावेळी रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या दुभाजकावर लागवलेले अण्णाद्रमुक पक्षाचे होर्डिंग तिच्या गाडीवर पडले. गाडी चालवत असतानचा होर्डिंग पडल्याने तोल जाऊन शुभाश्री रस्त्यावर पडली. त्याचवेळी मागून येणाऱ्या पाण्याच्या टँकरने तिला चिरडले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. खालील फोटोत दिसतेय ते अपघात झालेली ठिकाण

मद्रास उच्च न्यायलयाने अनेकदा सुचना करुनही राजकीय पक्ष आणि त्यांचे समर्थक बेकायदेशीरपणे होर्डिंग लावतात. रस्त्यांच्या आजूबाजूला आणि मध्यभागी उंचीवर लावलेल्या अशा बेकायदेशीर बॅनर आणि होर्डिंग्समुळे रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. २०१७ साली मद्रास उच्च न्यायलयाने तामिळनाडूमधील प्रमुख सिग्नलवर बॅनर, होर्डिंग्स आणि जाहिराती लावण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. एका समाजिक कार्यकर्त्याने केलेल्या जनहित याचिकेवर दिलेल्या निर्णयावर न्यायलयाने हा आदेश दिला होता.

या याचिकेमध्ये शहरामध्ये राजकीय कार्यक्रम असल्यास मोठे होर्डिंग लावणाऱ्या लोकांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. ‘असे बेकायदा होर्डिंग सामान्यांसाठी अडचण ठरत आहेत. या होर्डिंगमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही,’ असं निरिक्षण नोंदवले होते. न्यायलयाच्या आदेशानंतरही राज्यातील सत्ताधारी अण्णा द्रमुक आणि इतर राजकीय पक्षही सर्व नियमांना बगल देत होर्डिंग आणि बॅनर लावतात. अपघात झाला त्या रस्त्यावर खालील फोटोत दिसतात त्याप्रमाणे होर्डिंग लावण्यात आले आहेत.

यावरुन एम. के. स्टेलीन यांनी सत्ताधारी पक्षावर ट्विटवरुन टिका केली आहे. सरकारने दूर्लक्ष केल्याने शुभाश्रीचा मृत्यू झाला आहे. बेकायदेशीर बॅनर्समुळे आणखीन एकाला प्राण गमावावे लागले. सत्ताधाऱ्यांना आणखीन किती जणांचे जीव गेल्यानंतर जाग येणार आहे?’ असा संतप्त सवाल एम. के. स्टॅलिन यांनी केला आहे.

पुण्यातही झाला होता अपघात

बॅनर किंवा होर्डिंग पडल्याने अपघात होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षी पुण्यामध्ये एका सिग्नलवर असणारे होर्डिंग पडल्याने तीन जणांना प्राण गमावावा लागला होता. या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले होते. या अपघातामध्ये सहा रिक्षा, तीन दुचाकी आणि एक गाडीवर होर्डिंग पडले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 23 year old girl died chennai illegal aiadmk hoarding falls crushed truck scsg
First published on: 13-09-2019 at 11:10 IST