पाकिस्तानी संरक्षण दलाच्या जेट विमानांनी मंगळवारी वझिरिस्तान प्रांतातील अतिरेक्यांच्या तळावर केलेल्या जोरदार बॉम्बहल्ल्यात ३० अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले आह़े वायव्य पाकिस्तानातील टोळीवाल्यांच्या प्रदेशात शवाल खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला होता़
सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भल्या पहाटे करण्यात आलेल्या या हल्ल्यात अनेक अतिरेकी तळ उद्ध्वस्त करण्यात आल़े प्राय घर आणि रझन नाला या भागांतील हल्ल्यात सर्वाधिक अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आल़े तसेच उत्तर वझिरिस्तानमधील घरियुम गावातही त्याच वेळीही हल्ला करण्यात आला़
हल्ल्यात प्रामुख्याने अतिरेक्यांची प्रशिक्षण केंद्रे लक्ष्य करण्यात आली़ दक्षिण आणि उत्तर वझिरिस्तानमधील खिंड ताब्यात घेऊन अतिरेक्यांकडून येथे आत्मघातकी हल्लेखोर प्रशिक्षण देण्यात येत होत़े त्याबद्दल मिळालेल्या माहितीवरून हा हल्ला करण्यात आला़
गेल्या आठवडय़ापासून पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हवाई कारवाईमुळे या भागात लवकरच मोठी लष्करी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े
त्यामुळे या भागातून हजारो नागरिकांनी पळ काढण्यास सुरुवात केली आह़े तालिबान्यांनी पाकिस्तानी लष्करावर हल्ला करून २३ जणांना ठार केल्यानंतर पाक आणि तालिबानी यांच्यातील चर्चा स्थागित करण्यात आली आह़े मात्र अद्यापही तालिबान्यांनी शस्त्रसंधी करून चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन पाकिस्तानकडून करण्यात येत आह़े
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2014 रोजी प्रकाशित
पाकिस्तानकडून ३० अतिरेक्यांना कंठस्नान
पाकिस्तानी संरक्षण दलाच्या जेट विमानांनी मंगळवारी वझिरिस्तान प्रांतातील अतिरेक्यांच्या तळावर केलेल्या जोरदार बॉम्बहल्ल्यात ३० अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले आह़े

First published on: 26-02-2014 at 01:27 IST
TOPICSअतिरेकी
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 30 militants killed in air raid in nw pakistan