scorecardresearch

Premium

आईने आंघोळीसाठी हाक मारताच चिमुकला कारमध्ये लपला अन्…; ५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत

एका पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

car
पाच वर्षांच्या मुलाचा कारमध्ये गुदमरुन मृत्यू (प्रातिनिधीक फोटो)

गुजरातमधील जुनागड येथे हृदय पिळवटून टाकणारी घडली आहे. आंघोळ टाळण्याच्या प्रयत्नात एका पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. आईने नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी बोलावलं असता चिमुकला एका कारमध्ये जाऊन लपला. पण त्यानंतर त्याला कारमधून बाहेर पडता न आल्याने गुदमरून मृत्यू झाला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, आदित्य रवींद्र भारती असं मृत पावलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. बुधवारी सकाळी आदित्यच्या आईने त्याला आंघोळीसाठी बोलावलं. पण त्याला आंघोळ करायला आवडत नसल्याने त्याने घरातून पळ काढला आणि घराजवळील कारखान्यामध्ये पार्क केलेल्या कारमध्ये आश्रय घेतला. पण पुढच्याच क्षणी कारचा दरवाजा बंद झाला आणि आदित्य कारमध्ये अडकला.

man absconding for 12 years surrendered
१२ वर्षांपासून फरार, नंतर आत्मसमर्पण, कारण ऐकल्यावर बसेल धक्का
Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
soldier killed manipur
खळबळजनक! मणिपूरमध्ये जवानाची अपहरण करून हत्या, १० वर्षांच्या मुलानं सांगितला संपूर्ण घटनाक्रम
mahsa_amini
महसा अमिनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये काय बदलले? संस्कृतीरक्षक पोलिसांचे काय झाले?

हेही वाचा- लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी

मुलगा घरातून गायब झाल्याने पालकांनी खूप शोधाशोध केली. पण आदित्यचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता कारखान्यातील एका कारमध्ये आदित्य लपून बसल्याचं निदर्शनास आलं. यानंतर पालकांनी आदित्यला गाडीतून बाहेर काढलं, पण तो बेशुद्ध पडला होता.

हेही वाचा- संतापजनक: बलात्कार करून रस्त्यावर फेकलं; अल्पवयीन मुलीने अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत मागितली मदत पण…

पालकांनी त्याला तातडीने जुनागढ येथील रुग्णालयात दाखल केलं. पण त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला राजकोट येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. येथील डॉक्टरांनी आदित्यचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आलं नाही. डॉक्टरांनी आदित्यचा मृत्यू गुदमरून झाल्याचं घोषित केलं. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 5 years old boy dies of suffocation after hiding in parked car to avoid bath gujrat rmm

First published on: 27-09-2023 at 21:39 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×