scorecardresearch

Premium

लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी

Fire at Wedding Hall in Iraq : इराकमध्ये एका लग्नाच्या हॉलमध्ये आग लागून तब्बल १०० जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Fire at Wedding Hall in Iraq
या आगीत वधू-वराचाही होरपळून मृत्यू झाला आहे. (PC : Reuters)

Iraq Fire Accident : उत्तर इराकमधील निनेवेह प्रांतात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील अल-हमदानिया जिल्ह्यातील एका गावात लग्नाच्या हॉलमध्ये आग लागल्यामुळे तब्बल १०० जणांचा बळी गेला आहे. तर १५० हून अधिक लोक जखमी आहेत. जखमींपैकी काही जणांची अवस्था अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निनेवेह प्रांत हा इराकची राजधानी बगदादच्या वायव्येस ३३५ किलोमीटर दूर आहे. तर मोसुलपासून जवळ आहे. इराकी वृत्तसंस्था नीनाने दिलेल्या वृत्तानुसार या आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांमध्ये वधू आणि वराचाही समावेश आहे.

दरम्यान, या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रथमदर्शनी ही आग फटाक्यांमुळे लागली असावी असं सांगितलं जात आहे. नीना या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या फोटोत एक फायरफायटर आग विझवण्याचं काम करत आहे. तसेच स्थानिक पत्रकारांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये जळून खाक झालेला लग्नाचा हॉल दिसत आहेत.

Namrata Supriya
सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलमध्ये पोहोचली ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’तील लॉली, जेवणाचा आस्वाद घेऊन म्हणाली, “मेरे आँखों में मत झांको पर…”
car
आईने आंघोळीसाठी हाक मारताच चिमुकला कारमध्ये लपला अन्…; ५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत
online frauds in india DSP Viral VIDEO
“मुलीने निर्वस्त्र होऊन VIDEO कॉल केला अन्…,” सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीने थेट DSP ला दाखवला ‘तो’ व्हिडीओ
15-year-old girl committed suicide molestation rickshaw driver pune
पुणे: रिक्षाचालकाच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षाच्या मुलीची आत्महत्या

नीना या वृत्तसंस्थेने नागरी संरक्षण संचालनालयाचा हवाला देत म्हटलं आहे की, ज्वलनशील पदार्थांमुळे ही आग लागली असावी. निकृष्ट दर्जाचं बांधकाम साहित्य वापरलं असल्याने ज्वलनशील पदार्थांच्या संपर्कात आल्यानंतर हॉलचा काही भाग जळू लागला. अवघ्या काही क्षणात हॉलचा बराचसा भाग जळून कोसळला. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत अग्निशमन दलाचे जवान एकाच वेळी आग विझवण्याचं आणि आगीतून वाचलेल्यांना शोधण्याचं काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, आग लागली तेव्हा हॉलमध्ये लग्नाचा मुख्य कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे हॉलमध्ये शेकडो वऱ्हाडी उपस्थित होते. आग लागल्यानंतर बहुतांश पाहुणे बाहेर पळू लागले. परंतु, आग इतक्या वेगाने पसरली की जवळपास २०० ते २५० लोक आतच अडकले होते. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका, आरोग्य कर्मचारी, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी आणि लोकांना वाचवण्यासाठी सर्वांनीच शर्थीचे प्रयत्न केले.

हे ही वाचा >> “मनोज जरांगेंच्या ‘या’ मागणीला आमचा विरोध”, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य

दरम्यान, इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांनी प्रशासनाला या दुर्घटनेत मृत्यमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Iraq fire at wedding hall over 100 killed in nineveh 150 injured asc

First published on: 27-09-2023 at 10:37 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×