देशात गेल्या चोवीस तासांत ५७,११७ नवे रुग्ण आढळले, तर ७६४ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील करोना रुग्णसंख्या १६ लाख ९५ हजार ९८८ वर पोहोचली असून एकूण ३६,५११ रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या चोवीस तासांमध्ये ३६ हजार ५६९ रुग्ण बरे झाले असून एकूण करोनामुक्त रुग्णांचा आकडा १० लाख ९४ हजार ३७४ वर पोहोचला आहे.

राज्यात ९,६०१ नवे रुग्ण

राज्यात गेल्या २४ तासांत ३२२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या १५,३१६ झाली आहे.

मुंबईत १०५९ जणांना संसर्ग

मुंबईत गेल्या २४ तासांत १,०५९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील बळींची संख्या ६,३९५ झाली आहे. मुंबई २०,७४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत आतापर्यंत पाच लाख ३७ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी १,३९५ नवे रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ८७ हजार ३५१ वर पोहोचली. तर, दिवभरात ४२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यु झाला असून जिल्ह्य़ातील मृतांची संख्या २,४०७ झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 57000 corona infected in 24 hours in the country abn
First published on: 02-08-2020 at 00:34 IST