Japan Earthquake: गेल्या काही दिवसांपूर्वी मन्यानमारमध्ये प्रचंड मोठा भूकंप झाला होता. ज्यामध्ये हजारो लोकांना आपले प्राण गमावावे लागले आहे. अशात आता जपानमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.० इतकी होती. जपानच्या क्युशू राज्यात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३४ वाजता भूकंपाचे धक्के नोंदवण्यात आले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, या भूकंपाचे केंद्र क्यूशू बेटावर होते.

या भूकंपामुळे जपानमध्ये अद्याप कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही, परंतु लोक घाबरून घराबाहेर पडले आहेत. जपानमध्ये भूकंप ही नवीन गोष्ट नाही, हा देश भूकंपांच्या बाबतीत संवेदनशील मानला जातो. पण काळानुसार येथील सरकारने अशा व्यवस्था केल्या आहेत की भूकंपानंतरही जास्त नुकसान होण्याची शक्यता कमी असते.

भूकंपानंतर जपान हवामान संस्थेने अद्याप त्सुनामीचा इशारा दिलेला नाही, परंतु अद्याप कोणतेही मोठे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. क्यूशू हे जपानमधील तिसरे सर्वात मोठे बेट आहे आणि भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते. स्थानिक प्रशासनाने रहिवाशांना सतर्क राहण्याचा आणि संभाव्य भूकंपांसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे.

म्यानमारमध्ये २७०० हून अधिक लोकांचा मृत्यू

दरम्यान काही दिवसांपूर्वी म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात २७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक जखमी झाले आहेत. म्यानमारमध्ये सर्वात चिंताजनक बाब म्हणजे येथील बचाव कार्यात अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. या आव्हानांमध्ये, यंत्रांचा अभाव आणि रेशनची कमतरता या सर्वात मोठ्या समस्या आहेत.

जपानला त्सुनामीचा धोका

जपान सरकारने नुकताच एक अहवाल जारी केला आहे ज्यामध्ये असे नमूद केले आहे की, भूकंपप्रवण जपानच्या अर्थव्यवस्थेला त्यांच्या पॅसिफिक किनाऱ्याजवळ दीर्घकाळापासून अपेक्षित असलेल्या मोठ्या भूकंपाच्या घटनेत १.८१ ट्रिलियन डॉलर्सपर्यंतचे नुकसान होऊ शकते, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जपान सरकारच्या या अहवालात इशारा देण्यात आला आहे की, या अपेक्षित भूकंपामुळे विनाशकारी त्सुनामी येऊ शकते, शेकडो इमारती कोसळू शकतात आणि सुमारे ३ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो.