Crime News : सहा महिन्यांपूर्वी एक मुलगी बेपत्ता झाली होती, तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तरुणीच्या प्रियकराला अटक केली. ही घटना कर्नाटकातल्या गदगमधली आहे. पोलिसांनी या तरुणीच्या २८ वर्षीय बॉयफ्रेंडला अटक केली.

पोलिसांनी काय सांगितलं?

कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश हिरेमठ नावाच्या इसमाने त्याची प्रेयसी मधुश्री अंगडीची हत्या केली. ही घटना सहा महिन्यांपूर्वीची आहे. सतीशने मधुश्रीची हत्या केली आणि तिचा मृतदेह पुरला. सतीश आणि मधुश्री यांचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. १६ डिसेंबर २०२४ ला मधुश्रीने घर सोडलं त्यानंतर ती बेपत्ता झाली. तिचा शोध घेतला गेला पण ती सापडली नाही. ती बाहेर गेली आहे असं सांगण्यात आली. ती बेपत्ता झाल्याची तक्रार १२ जानेवारी २०२५ ला दाखल करण्यात आली कारण ती सापडतच नव्हती. यानंतर पोलिसांनी तिचा बराच शोध घेतला. त्यानंतर पोलिसांना तपासात समजलं की सतीश हिरेमठ बरोबर मधुश्री गेली होती. त्याच रात्री ती गायब झाली. सुरुवातीला पोलिसांना सतीशवर संशय आला नाही. पण त्याचं मोबाइल लोकेशन तपासल्यानंतर पोलिसांना संशय आला होता. दरम्यान सुरुवातीला त्याने गुन्हा नाकारला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सतीशने मधुश्रीची हत्या कशी केली?

सतीश आणि मधुश्री बरोबर गेले होते. त्यानंतर त्या दोघांमध्ये लग्नावरुन वाद झाला. यावेळी अचानक सतीशचा राग अनावर झाला आणि त्याने मधुश्रीचा गळा दाबला. तसंच त्याने तिचा मृतदेह पुरला आणि ती बेपत्ता झाली आहे असा बनाव रचला. सतीश पेट्रोल पंपावर काम करायचा. मधुश्रीची हत्या केल्यानंतर त्याने त्याचं काम कायम ठेवलं. सुरुवातीला त्याची चौकशी झाली तेव्हा मधुश्रीला मी भेटलोच नाही असं त्याने पोलिसांना सांगितलं होतं. सतीश खोटं बोलतोय असं पोलिसांना वाटत होतं. पोलिसांनी त्याच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन तपासलं. त्यानंतर सतीशची पुन्हा कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर सतीशने गुन्हा कबूल केला. त्याने मधुश्रीला जिथे पुरलं होतं त्या ठिकाणीही नेलं. पोलिसांनी तिथे खोदकाम केल्यानंतर त्यांना तिथे मधुश्रीचा सांगाडा आढळला. त्या सांगाड्याची कवटी गायब आहे. या सांगाड्याची चाचणी फॉरेन्सिक विभाग करतो आहे. तसंच मृत्यूचं कारण या अहवालानंतरच समोर येणार आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सतीश हिरेमठला अटक केली आहे. त्याची पुढील चौकशी सुरु आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.