पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांचे पुत्र अलि हैदर गिलानी यांच्या ९ मे रोजी झालेल्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. अटक झालेले सर्व अफगाणी निर्वासित आहेत. गिलानी यांच्या पुत्राचा शोध घेत पोलिसांचे पथक खैबर पख्तुनवाला प्रांतातील नौशेरा जिल्ह्य़ातील अखोरा खट्टक गावी गुरुवारी पहाटे थडकले. तेथे सरदार अली याच्या निवासस्थानी त्यांनी छापा मारला. तेथे सहाजणांना अटक केली आणि अब्दुल वहाब नावाच्या अपहृत तरुणाला त्यांनी मुक्त केले मात्र हैदरचा शोध लागला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 17th May 2013 रोजी प्रकाशित
गिलानी पुत्राच्या अपहरणप्रकरणी ६ संशयितांना अटक
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांचे पुत्र अलि हैदर गिलानी यांच्या ९ मे रोजी झालेल्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. अटक झालेले सर्व अफगाणी निर्वासित आहेत.
First published on: 17-05-2013 at 02:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 suspects arrested in gilanis son kidnapping case in pak