केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आज ७ महीने पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील शेतकरी आक्रमक झाला आहे. संयुक्त किसान मोर्चाने देशभरातील राज भवनावर मोर्चाचे आयोजन केले आहे.  या दरम्यान, राष्ट्रपती व्दारा नियुक्त सर्व देशभरातील राज्यपालांना निवेदन देण्यात येईल. किसान मोर्चाने या मोर्चाला “शेती वाचवा, लोकशाही वाचवा” असे नाव दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकरी नेते युध्दवीर सिंग ८ ते १० लोकांसह दिल्लीतील उपराज्यपालांच्या घराजवळ पोहोचले. पोलिसांनी त्यांना राजभवनात जाऊ दिले नाही. त्यांना ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी लेफ्टनंट गव्हर्नर दिल्लीच्या निवासस्थानाबाहेर तटबंदी केली आहे. जेणेकरून शेतकरी तिथे पोहोचू शकणार नाहीत. उपराज्यपालांच्या घराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय काटेरी तारांनी बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर थांबविण्यासाठी ट्रक आणि डंपर रस्त्यावर उभे केले आहेत.

जाणून घ्या: शेतकरी आंदोलनाचं मूळ असलेलं MSP म्हणजे काय?

मेट्रोचा यलो मार्गावरील तीन मुख्य स्थानके चार तास बंद ठेवण्याचा निर्णय

दरम्यान, आम्ही दिल्ली एलजीच्या निवासस्थानी ट्रॅक्टर नेणार नाही, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी शेतकरी नेत्यांना भेटण्यासाठी वेळ दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत म्हणाले की, केंद्राच्या तीन कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी शनिवारी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी वेगवेगळ्या राज्यांच्या राज्यपालांना निवेदन देतील. कृषी कायद्यांविरोधातीला आंदोलनाला सात महिने पूर्ण झाल्यानिमित्त हे निवेदन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना संबोधित केले जाईल.

शेतकरी आंदोलनाच्या भीतीपोटी दिल्ली मेट्रोने शनिवारी यलो मार्गावरील तीन मुख्य स्थानके चार तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली ते हरियाणा दरम्यान सिंघू सीमेशिवाय शेतकरी टिकरी आणि गाजीपूर सीमेवरही आंदोलन करीत आहेत. म्हणून खबरदारी म्हणून दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि पोलिसांनी सुरक्षा तैनात केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 months completed for farmers agitation in delhi morcha organized at raj bhavan across country srk
First published on: 26-06-2021 at 14:48 IST