7 peaple charred to death after car-SUV collision : गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात रविवारी झालेल्या कार अपघातात किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना दिली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी एका स्विफ्ट डिझायर कारची टाटा हॅरियर SUV कारची समोरासमोर जोरदार टक्कर झाल्यानंतर हा अपघात झाला.
पोलिस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, अपघातानंतर स्थानिक लोक, पोलीस आणि १०८ पथकाने बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली.
“दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास देदादरा गावाजवळ घडलेल्या या घटनेत कारमधील सात जण जिवंत जळाले तर एसयूव्हीमधील तिघे जण किरकोळ जखमी होऊन बचावले,” असे वाढवन पोलिस ठाण्याचे निरीक्षक पीबी जडेजा यांनी सांगितले.
दुपारी साडेतीनच्या सुमारास देदादरा गावाजवळ घडलेल्या या दुर्घटनेत कारमधील ७ जण जिवंत जळाले तर एसयूव्हीमधील तिके किरकोळ जखमांसह बचावले, अशी माहिती वाधवन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी. बी. जडेजा यांनी सांगितले.
या दुर्घटनेनंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती असे वृत्त पीटीआयने दिले आहे.