देशातील ७० टक्के महाविद्यालयीन विद्यार्थी स्मार्टफोन वापरतात आणि महानगरांपेक्षा लहान शहरांमध्ये स्मार्टफोन वापरणाऱया विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे… हे निष्कर्ष आहेत सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रगण्य टीसीएस कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातील.
एकूण दहा विद्यार्थ्यांमागे सहा जण स्मार्टफोन वापरत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले. देशातील एकूण १४ शहरांमधील १७,५०० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची माहिती सर्वेक्षणात जमविण्यात आली. त्यामध्ये महानगरांमधील ५८.५० टक्के विद्यार्थी स्मार्टफोन वापरतात असे आढळले. हेच प्रमाण लहान शहरांमध्ये ५९.३६ टक्के इतके आहे, असे टीसीएने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
स्मार्टफोन आणि त्यातील इंटरनेट सुविधा यामुळे अनेक विद्यार्थी हे इतरांसोबत सातत्याने जोडले गेले असल्याचेही सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jun 2013 रोजी प्रकाशित
महानगरांपेक्षा लहान शहरांतील विद्यार्थी स्मार्टफोन वापरण्यात हुश्शार!
एकूण दहा विद्यार्थ्यांमागे सहा जण स्मार्टफोन वापरत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले.

First published on: 17-06-2013 at 05:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 70 pc students use smartphones more userbase in small cities