रशियाच्या अतिपूर्व भागाजवळ ८.८ रिश्टर स्केलच्या अतितीव्र अशा भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली. जपान, हवाई बेटे आणि अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर या भूकंपाची कंपने जाणवली. भूकंपात कुठल्याही मोठ्या नुकसानाची नोंद अद्याप झालेली नाही. नंतर त्सुनामीच्या शक्यतेचा इशारा कमी करण्यात आला. मात्र, प्रशासनाने नागरिकांना किनाऱ्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आले.

रशियामधील कॅमचातका द्वीपकल्पावरील बंदरांवर या भूकंपानंतर समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणावर घुसले. येथील नागरिकांनी किनाऱ्यापासून दूर धाव घेतली. उत्तर जपानमध्ये किनाऱ्यावर समुद्राच्या मोठ्या लाटा उसळल्या. हवाई येथे महामार्गांवर मोठी कोंडी झाली होती. जपानमध्ये अनेक नागरिक सुरक्षित स्थळांवर विस्थापित झाले. रशियाने भूकंपनानंतर अनेक जण जखमी झाल्याची माहिती दिली.

कॅमचातका येथे तीन ते चार मीटर उंचीच्या त्सुनामीची नोंद झाली. जपानच्या उत्तरेकडील बेटांवर समुद्राच्या लाटा ६० सेंटिमीटर अधिक उंच आणि अलास्का येथील एल्युशन बेटावर १.४ फूट अधिक उंच झाल्याची नोंद करण्यात आली. भूकंपानंतर काही तासांनी हवाई आणि जपानमध्ये त्सुनामीचा इशारा सौम्य करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.