बिहारच्या सारण जिल्ह्य़ातील कर्णपूर गावाजवळ दोन बसगाडय़ांची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात आठ जण ठार झाले, तर १७ जण जखमी झाले.
पाटण्याहून सिवमला जाणारी आणि सिवमहून पाटण्याला येणाऱ्या बसगाडय़ांची समोरासमोर टक्कर झाली त्यामध्ये सहा जण जागीच ठार झाले. छप्रा सदर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक पाटणा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या वाटेवर असताना मरण पावला.
या अपघातात १७ जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांवर मरहौरा हॉस्पिटलमध्ये, तर उर्वरित जखमींवर सदर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, असे उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार यांनी सांगितले.
मृतांपैकी सहा जणांची नावे राजेंद्र उपाध्याय (६५), ब्रजेशकुमार (३४), कुमारी निहारिका (२२), संतोषकुमार मंझी (४०), अरविंदकुमार (३५) आणि निझामुद्दीन (२६) अशी आहेत. या प्रकारानंतर दोन्ही गाडय़ांचे चालक पसार झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 8th Dec 2013 रोजी प्रकाशित
बिहारमध्ये दोन बसगाडय़ांची टक्कर : ८ ठार, १७ जखमी
बिहारच्या सारण जिल्ह्य़ातील कर्णपूर गावाजवळ दोन बसगाडय़ांची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात आठ जण ठार झाले, तर १७ जण जखमी झाले.

First published on: 08-12-2013 at 05:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 killed and 17 injured in bihar bus accident