देहरी-ऑन-सोने (बिहार) :  राज्याच्या रोहटस जिल्ह्य़ात पोलिसांनी सोमवारी एका खासगी वाहनातून तपासणीदरम्यान बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी नेला जाणारा सुमारे ८० किलो गांजा पकडला. सुमारे आठ लाख रुपये किमतीचा हा गांजा राष्ट्रीय महामार्ग २ वर पकडण्यात आला. राष्ट्रीय महामार्गावर भेडिया गावाजवळ पोलिसांकडून वाहनांची नेहमीप्रमाणे तपासणी सुरू असताना खेळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एका चारचाकी गाडीत हा गांजा सापडल्याचे पोलीस महानिरीक्षक मनी महाजन यांनी सांगितले. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून ते उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील रहिवासी आहेत. ओदिशातून जकात चुकवून अलाहाबाद येथे विक्रीसाठी हा गांजा नेण्यात येत होता, असे पोलिसांनी चौकशीनंतर सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 80kg ganja found
First published on: 25-12-2012 at 04:17 IST