8th Pay Commission Update : केंद्र सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. खरं तर आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? याबाबत अनेक दिवसांपासून सवाल विचारले जात आहेत. मात्र, आता आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगांतर्गत १ कोटींपेक्षा जास्त केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना ३० ते ३४ टक्के पगारवाढ मिळू शकते अशी माहिती समोर आली आहे.

पण आठवा वेतन आयोग नेमकं कधी लागू केला जाणार? याविषयीची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, तरीही आर्थिक वर्ष २०२७ मध्ये ही वाढ अपेक्षित असल्याचं बोललं जात आहे. ‘अँबिट कॅपिटल’च्या अहवालातून ही माहिती समोर आल्याचं वृत्त टाईम्स नाऊने दिलं आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली असली तरी अद्याप आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

दरम्यान, ७ व्या वेतन आयोगाची स्थापना झाल्यानंतर अंतिम शिफारसी सादर करण्यासाठी तब्बल १८ महिने लागले होते. कारण जरी औपचारिकपणे स्थापना झाली तरी आयोगाला भागधारकांशी संवाद साधून त्याबाबतचा अहवाल तयार करावा लागतो. त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी जातो. त्यामुळे आता आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणीसाठी किती कालावधी लागणार? ही कालमर्यादा सांगता येणार नाही. कारण वेतनवाढीचा आढावा घेण्यासाठी आणि पुन्हा फेर संरचना करण्यासाठी व सुधारणा करण्यासाठी वेळ लागत असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठव्या वेतन आयोगामुळे ३० ते ३४ टक्के पगारवाढ होऊ शकते?

दरम्यान, अँबिट कॅपिटलच्या अहवालानुसार अशी अपेक्षा आहे की, आठव्या वेतन आयोगात फिटमेंटची शिफारस केली असेल. ज्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ३० ते ३४ टक्के पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अहवालात असंही म्हटलं आहे की, आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर आर्थिक वर्ष २६ मध्ये सुरू झालेल्या युनिफाइड पेन्शन योजनेअंतर्गत, कर्मचारी पेन्शन फंडमध्ये सरकारचे योगदान पगाराच्या १४ टक्यावरून १८.५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते.