शाही विवाहापासून जगभरच्या माध्यमांचे लाडके बनलेल्या आणि पापाराझोंनी वादग्रस्त बनविलेल्या केट मिडलटन आणि राजपुत्र विल्यम यांच्या विवाहजीवनातील परमोच्च बातमी तिच्या गरोदरपणापासून ब्रिटनसह संपूर्ण युरोप खंडामध्ये कुतूहलाची बनली होती. त्यातच आपले होणारे बाळ मुलगी असल्याचे गुपित खुद्द केटकडूनच अनवधानाने फुटल्यामुळे राजघराण्यामध्ये खळबळ उडाली आहे. केंब्रिजच्या राणीने केट मिडलटनला ‘टेडी बेअर’ भेट दिला असताना, तिच्या तोंडून ‘धन्यवाद, हे मी माझ्या मुलीसाठी जपून ठेवेन’ असे निघाले आणि क्षणात ‘मुलगी होणार हो’ची दवंडी माध्यमांचे मध्यवर्ती वृत्त बनले. त्यानंतर आम्ही काहीच सांगणार नसल्याचे सांगून शुभेच्छुकांना परतवण्यामध्ये केटची पुरती धांदल उडाली.
राजघराण्यातील मोठी सून असलेल्या केट मिडलटन हिचे अपत्य हे पुढील गादी चालविणारे असल्यामुळे तिला होणारे बाळ मुलगा की मुलगी याबाबत खुद्द राजघराणे आणि त्यांच्या हितेच्छुकांचे लक्ष लागून आहे. जुलै महिन्यामध्ये तिची प्रसूती होणे अपेक्षित असलेल्या केटकडून काही माहिती मिळतेय का, यासाठीही अनेक मार्गानी आतल्या व बाहेरच्या सूत्रांची तिच्यावर नजर आहे. तिने त्याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचा दावा केलेला असला, तरी डचेस ऑफ केंब्रिज डायना बर्टन हिच्या भेटवस्तूने तिच्या पोटातील खरे ‘रहस्य’ अचानक ओठावर आल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी कोणत्याही राजसुनेच्या अपत्याचे लिंग प्रसूतीपूर्वी जाहीर करण्यात आलेले नसल्याचे ‘टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. या वृत्तामुळे ब्रिटनची सारी सायंदैनिके ‘मुलगी होणार हो’, ‘केटचे बाळ पुढची राणी’च्या मथळ्यांनी भरली आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2013 रोजी प्रकाशित
मुलगी होणार हो..
शाही विवाहापासून जगभरच्या माध्यमांचे लाडके बनलेल्या आणि पापाराझोंनी वादग्रस्त बनविलेल्या केट मिडलटन आणि राजपुत्र विल्यम यांच्या विवाहजीवनातील परमोच्च बातमी तिच्या गरोदरपणापासून ब्रिटनसह संपूर्ण युरोप खंडामध्ये कुतूहलाची बनली होती. त्यातच आपले होणारे बाळ मुलगी असल्याचे गुपित खुद्द केटकडूनच अनवधानाने फुटल्यामुळे राजघराण्यामध्ये खळबळ उडाली आहे.

First published on: 07-03-2013 at 02:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A baby girl for william and kate