छत्तीसगड येथील सुकमामधील गचनपल्ली गावात ‘डीआरजी'(डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह फोर्स)कडून करण्यात आलेल्या कारवाईत एक लाखाचा इनाम असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा झाला आहे. कडती मुत्ता असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक झालेल्या ठिकणावरून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. बस्तरचे आयजी पी सुंदरराजन यांनी याबाबत माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अगोदर छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्य़ात गुरुवारी नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला होता. तर, दंतेवाडा जिल्ह्यातील काटेकल्याण येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते.

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तर परिसरात सध्या नक्षलविरोधी अभियान जोरदार सुरू आहे. १५ सप्टेंबर रोजी सुकमा जिल्ह्यात जवानांनी चकमकीत तीन नक्षलींचा खात्मा केला होता. त्याच्या एक दिवस अगोदरच बस्तर परिसरात तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते.

तर दंतेवाडा जिल्ह्यात दोन आणि बीजापुरमध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. जवानांकडून होत असलेल्या या कारवायांमुळे नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले असून काहीजण आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारत आहेत, तर काहीजण आपला रोष व्यक्त करण्यासाठी नागरिकांवर हल्ले करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A naxal carrying a reward of rs 1 lakh on his head was killed in an encounter msr
First published on: 13-11-2019 at 18:09 IST