सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आज पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर चार किलोग्रॅम संशयित प्रतिबंधित पदार्थ वाहून नेणारे पाकिस्तानी ड्रोन पाडले. बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, ड्रोन उडत असताना जवानांना त्याचा आवाज ऐकू आला, त्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास ड्रोनचा शोध घेण्यात आला. ड्रोन पाडण्यासाठी त्यांनी “पॅरा बॉम्ब” चा वापर केला.

बीएसएफच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ड्रोनला एक छोटी हिरवी पिशवी जोडलेली होती आणि त्यात पिवळ्या फॉइलने बांधलेले चार पॅकेट आणि काळ्या फॉइलने बांधलेले एक लहान पॅकेट होते. संशयित प्रतिबंधित पदार्थाचे पॅकिंगसह वजन सुमारे ४.१७ किलो आणि काळ्या फॉइलमध्ये गुंडाळलेल्या पॅकेटचे वजन सुमारे २५० ग्रॅम होते. ड्रोनचे मॉडेल DJI Matrice 300 RTX होते.

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
loksatta explained article, crude oil price, hike, Iran Israel conflict, india, on petrol diesel prices
विश्लेषण : इराण-इस्रायल संघर्षातून खनिज तेलाचा भडका… भारतात निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढ अटळ?
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न

याआधी शनिवारी बीएसएफने जम्मूमध्ये संशयित पाकिस्तानी ड्रोन पाहिल्यावर त्यावर गोळीबार केला होता. पहाटे ४ वाजून १० मिनिटांच्या सुमारास अरनियाच्या नागरी क्षेत्रात हे ड्रोन प्रवेश करत असताना, त्यावर बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला होता.