scorecardresearch

नरेंद्र मोदींना घरचा आहेर, दिल्ली भाजपचे उपाध्यक्ष अमिर रझांचा राजीनामा

दोन महिन्यांपूर्वी भाजपच्या दिल्ली प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेले नाट्यदिग्दर्शक अमिर रझा हुसेन यांनी भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदींना घरचा अहेर दिला.

नरेंद्र मोदींना घरचा आहेर, दिल्ली भाजपचे उपाध्यक्ष अमिर रझांचा राजीनामा

दोन महिन्यांपूर्वी भाजपच्या दिल्ली प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेले नाट्यदिग्दर्शक अमिर रझा हुसेन यांनी भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदींना घरचा अहेर दिला. एका दूरचित्रवाणी कार्यक्रमामध्ये हुसेन यांनी गुजरातमध्ये २००२च्या धार्मिक दंगलींना नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत, असे जाहीरपणे सांगत त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
शेकडो मुस्लिमांची हत्या २००२च्या दंगलीमध्ये झाली होती. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत हुसेन यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे मात्र तोंडभरून कौतुक केले. देशामध्ये सद्यस्थितीमध्ये केवळ अडवाणी हेच एकमेव ‘मुत्सद्दी’ राजकारणी असल्याचे हुसेन म्हणाले.
हुसेन यांनी मोदी आणि अडवाणी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे भाजपमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. हुसेन यांनी नरेंद्र मोदींना लक्ष्य करत मोदी समाजामध्ये फूट पाडणारे नेते असून, समाजाचे एकीकरण त्यांच्याकडून कधीच होणार नाही असे सांगितले. रागावलेल्या हुसेन यांनी भाजपच्या  
पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या