दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने रविवारी (४ डिसेंबर) सकाळी दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम आणि शिक्षणमंत्री आतिशी मार्लेना यांच्या निवासस्थानी धडक दिली. यावेळी आतिशी घरात नव्हत्या. त्यामुळे पोलीस पथकाने काही वेळ आतिशी यांच्या घराबाहेर त्यांची वाट पाहिली आणि परत गेले. आतिशी मार्लेना दुपारी घरी परतल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेशन विभागाचं पथक पुन्हा एकदा मार्लेना यांच्या घरी पोहोचलं. पोलिसांनी आतिशी मार्लेना यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे नोटीस सोपवली आणि माघारी परतले. आम आदमी पार्टीने भारतीय जनता पार्टीवर आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी ही नोटीस असल्याचं सांगितलं जात आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनादेखील याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. आम आदमी पार्टीच्या आमदारांच्या घोडेबाजाराच्या आरोपांप्रकरणी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शुक्रवारी (२ फेब्रुवारी) रात्री केजरीवाल यांच्या घरी गेले होते. अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की, भारतीय जनता पार्टी आपचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने चौकशीला सुरुवात केली असून शुक्रवारी केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. तसेच तीन दिवसांमध्ये या नोटिशीला उत्तर देण्यास सांगितलं आहे.

Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले
Nashik Lok Sabha
साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की, “भारतीय जनता पार्टीतले लोक आम आदमी पार्टीच्या २१ आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी भाजपाने आपच्या सात आमदारांशी संपर्क साधला आहे.” दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम आणि शिक्षणमंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला होता की, भाजपा आपच्या आमदारांना प्रत्येकी २५-२५ कोटी रुपयांची ऑफर देत आहे. २५ कोटी रुपये घ्या आणि भाजपात या अशी थेट ऑफर भाजपाने आपच्या आमदारांना दिली आहे. योग्य वेळी आम्ही त्यांच्या ऑडिओ क्लिप्सदेखील सादर करू.

दुसऱ्या बाजुला भाजपाने केजरीवाल आणि आतिशी मार्लेना यांच्या आरोपांचं खंडण केलं आहे. तसेच ज्या आमादारांशी भाजपाने संपर्क साधल्याचा दावा केला जात आहे त्यांची नावं जाहीर करण्याची मागणीदेखील भाजपाकडून करण्यात आली आहे. दिल्ली भाजपाचे सचिव हरिश खुराना यांनी आतिशी मार्लेना यांना आव्हान दिलं आहे की, त्यांनी संबंधित आमदारांची नावं जाहीर करावी. अन्यथा असले फालतू आरोप करू नयेत. हरिश खुराना म्हणाले, असे आरोप करून केजरीवाल आणि आतिशी मार्लेना राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवरून लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे ही वाचा >> केरळमधील युवा संमेलनात ‘भारत माता की जय’ घोषणेस नकार; केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी संतापल्या, म्हणाल्या…

दरम्यान, गुन्हे अन्वेशन विभागाने केजरीवाल आणि आतिशी मार्लेना यांना पुरावे सादर करण्यास सांगितलं आहे. आप नेते जर भाजपावर आमदारांना पैसे देऊन आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप करत असतील तर त्यांनी याबाबतचे पुरावे द्यावेत, तसेच त्यांनी दावा केल्याप्रमाणे व्हिडीओ क्लिप्स सादर कराव्यात, असं गुन्हे अन्वेशन विभागाने म्हटलं आहे.