आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी केरळमधील परिचारिकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल माफी मागितली असल्याचे केरळमधील आपच्या कार्याकलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
केरळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुमार विश्वास यांच्यावर २००८ मधील एका भाषणात केरळमधील परिचारिकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. याचे काही पुरावे दाखवून काँग्रेसच्या महिला युनिटच्या उपाध्यक्षा बिंदू कृष्णा यांनी या प्रकरणी विश्वास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकरणावर कुमार विश्वास यांनी माफी मागितली असल्याचे ‘आप’च्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
याआधीही कुमार विश्वास यांच्या भाषणामुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या मुद्द्यावरून श्रीराम जन्मभूमी सेवा समितीचे सरचिटणीस आर. पी. मिश्रा यांनी तक्रार दाखल केली होती. हिंदू देवतांविरुद्ध त्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप मिश्रा यांनी पोलीसांकडे केलेल्या तक्रारीत केला. त्यानंतर पोलीसांनी भारतीय दंडविधान संहितेच्या कलम २९५ आणि २९५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2014 रोजी प्रकाशित
‘आप’चे नेते कुमार विश्वास यांचा माफीनामा
आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी केरळमधील परिचारिकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल माफी मागितली असल्याचे केरळमधील आपच्या कार्याकलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

First published on: 22-01-2014 at 01:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap executive member kumar viswas apologises for his remarks against kerala nurses