‘आम आदमी पक्षा’चे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून शाई फेकण्यात आल्यामुळे दिल्लीत चांगलीच खळबळ उडाली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने ‘आम आदमी पक्षा’तर्फे जंतर-मंतर मैदानावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित असणा-या ‘आप’चे नेते योगेंद्र यादव यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने शाई फेकली आहे. योगेंद्र यादव यांनी मात्र, या प्रकारानंतर प्रतिक्रीया देताना सदर घटनेमुळे आपल्या मनात कोणतीही लाजिरवाणी भावना उत्पन्न झाली नसल्याचे सांगितले. दरम्यान यादव यांच्यावर शाई फेकणा-या अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या इसमाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2014 रोजी प्रकाशित
आपचे नेते योगेंद्र यादव यांच्यावर फेकली शाई
आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून शाई फेकण्यात आल्यामुळे दिल्लीत चांगलीच खळबळ उडाली आहे.

First published on: 08-03-2014 at 04:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap leader yogendra yadavs face smeared with ink at delhi event