scorecardresearch

“डोकं अदाणींचं अन् पैसा मोदींचा”, अरविंद केजरीवालांचा पंतप्रधानांवर गंभीर आरोप; म्हणाले, “जगातील…”

“…अन् तेव्हा पंतप्रधान मोदी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते”

kejriwal modi
अरविंद केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अदाणी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जनता जीएसटी भरते आणि ते पैसे पंतप्रधान मोदींजवळ जातात. काँग्रेसने ७५ वर्षात जेवढं लुटलं नाही, तेवढं यांनी ( भाजपा ) ७ वर्षात लुटलं. डोकं अदाणींचं आणि पैसा पंतप्रधान मोदींचा असतो, असा हल्लाबोल केजरीवाल यांनी विधानसभेत बोलताना केला आहे.

“जेव्हा अदाणी जगातील सर्वात श्रीमंत दुसरे व्यक्ती बनले. तेव्हा, पंतप्रधान मोदी जगातील सर्वात श्रीमंत दुसरे व्यक्ती बनले होते. आता ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनू इच्छित आहेत. तसेच, अदाणी समूहात सर्व पैसा पंतप्रधान मोदी यांचा आहे,” असा गौप्यस्फोट केजरीवाल यांनी केला आहे.

हेही वाचा : बंगला रिकामा करण्याच्या नोटीसला राहुल गांधींनी दिलं उत्तर; म्हणाले, “गेल्या चार टर्मपासून…!”

“पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे यांची भेट घेत अदाणी समूहाला पवन उर्जाचा प्रकल्प मिळवून दिला. हा प्रकल्प अदाणी नाहीतर स्वत:साठी घेतला आहे. आपल्याकडं संसदीय समिती असते, तसेच श्रीलंकेतील एका समितीने वीज बोर्डाच्या अध्यक्षाला बोलवत विचारलं, हा प्रकल्प अदाणी समूहाला का दिला?, त्यावर अध्यक्षाने सांगितलं की, हा प्रकल्प अदाणी समूहाला देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा राजपक्षे यांच्यावर खूप दबाव आहे,” असं केजरीवाल यांनी म्हटलं.

हेही वाचा : ‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हजर व्हा…’; दिल्ली उच्च न्यायालयाचं समन्स, काय आहे प्रकरण?

“तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशा करत दुसऱ्यांच्या कंपन्यांवर ताबा घेण्यात येत आहे. पहिल्यांदा कृष्णापट्टनम येथील बंदरावर धाड टाकण्यात आली. काही वर्षानंतर ते अडाणींनी विकत घेतलं. तसेच, एसीसी आणि अंबुजा सिमेंट कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले. नंतर ते अदाणींनी विकत घेतलं,” असेही केजरीवाल यांनी सांगितलं. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 18:37 IST

संबंधित बातम्या