ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव आणि राम जन्मभूमी खटल्यातील ज्येष्ठ वकील जफरयाब जिलानी यांचं निधन झालं आहे. ते ७३ वर्षांचे होते. मे २०२१ मध्ये पडल्यानंतर त्यांच्या मेंदूला दुखापत झाली होती. यानंतर ते दीर्घकाळ आजारी होते. बुधवारी (१७ मे) लखनौमधील निशात हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जफरयाब जिलानी यांचा दफनविधी बुधवारी लखनौमधील कैसरबाग येथील दफनभूमीत झाला. त्यांच्यामागे त्यांची पत्नी अजरा जिलानी, एक मुलगी मारिया रहमान आणि दोन मुले नजफजफर व अनसजफर हे आहेत. त्यांचं कुटुंब लखनौमधील कैसरबाग येथे राहतं.

कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, “जफरयाब जिलानी यांना अनेक आरोग्यविषयक त्रास होते. त्याबाबत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मुत्राशयातही संसर्ग झाला होता. हा संसर्ग फुफ्फुसापर्यंत पसरला होता. किडनी आणि मेंदूवरही परिणाम झाला होता. मे २०२१ मध्ये पडल्यानंतर हे सर्व आजार बळावले होते.”

हेही वाचा : मुस्लिम बांधवांनी ‘या’ गावात पुन्हा बांधलं वादळात उद्ध्वस्त झालेलं राम मंदिर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जफरयाब जिलानी कोण होते?

जिलानी उत्तर प्रदेशचे माजी अतिरिक्त महाधिवक्ताही होते. याशिवाय बाबरी मशीद कृती समितीचे समन्वयक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. त्यांनी मागील अनेक दशकं राम जन्मभूमी खटल्यात विविध न्यायालयांमध्ये युक्तिवाद केला.