तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर परिस्थिती चिघळली असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. अफगाणिस्तानातील स्थितीवर संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. अफगाणिस्तान भारताच्या शेजारी असल्याने भारताच्या चिंतेतही वाढ झाली. भविष्यात दहशतवाद आणखी वेगाने फोफावण्याची भीती भारताने व्यक्त केली आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. जवळपास ४५ मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला.
“माझी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्याशी अफगाणिस्तानातील स्थितीवर चर्चा झाली. तिथल्या घडामोडींवर आम्ही सविस्तर मुद्दे मांडले आणि विचार विनिमय केला. त्याचबरोबर करोनाविरुद्धच्या लढाईत दोन्ही देशांच्या द्विपक्षीय अजेंड्यावरही चर्चा केली. यापुढेही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होत राहतील”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
Had a detailed & useful exchange of views with my friend President Putin on recent developments in Afghanistan. We also discussed issues on bilateral agenda, including India-Russia cooperation against COVID-19. We agreed to continue close consultations on important issues:PM Modi pic.twitter.com/3fhWA2pS3m
— ANI (@ANI) August 24, 2021
“अफगाणिस्तानातील स्थितीवर दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. देशात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला. अफगाणिस्तानातून डोकं वर काढणारी दहशतवादी विचारधारा आणि अंमली पदार्थांची तस्करी याचा संभाव्य धोका पाहता दोन्ही देशात चर्चा झाली. यासाठी दोन्ही देशांनी एक स्थायी द्विपक्षीय तोडगा काढण्याचं मान्य केलं आहे.”, असं रशियन सरकारकडून सांगण्यात आलं आहे.