scorecardresearch

Premium

“सर्वोत्तम वाईन, ताजमध्ये डिनर…अयोध्येचा निकाल दिल्यानंतर केलं होतं सेलिब्रेशन” ; रंजन गोगोईंची माहिती

या निकालानंतर खंडपीठातल्या सर्वांनी एकत्र फोटो घेतल्याचंही गोगोई यांनी नमूद केलं आहे.

Ranjan-Gogoi-SA-Bobde
शरद बोबडे यांच्यासह माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई (सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी खंडपीठात समाविष्ट असणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांसोबत सेलिब्रेशन केल्याचा खुलासा त्यांनी स्वतः केला आहे. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी अयोध्येतल्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल देण्यात आला होता. या निकालानंतर आपण आपल्या सहकाऱ्यांसह ताज हॉटेल मानसिंगमध्ये रात्रीचं जेवण घेतलं होतं, तसंच सर्वोत्तम वाईन मागवून सेलिब्रेशन केलं होतं, असा खुलासा गोगोई यांनी केला आहे.

अयोध्या खटला त्यांच्या आत्तापर्यंतच्या व्यावसायिक आयुष्यातला एक महत्त्वाचा खटला होता. यामुळे ते चर्चेतही आले होते. गोगोई सध्या राज्यसभा खासदार आहेत. त्यांनी आपल्या ‘जस्टीस फॉर द जज’ या आत्मचरित्रात आपल्या व्यावसायिक आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांबद्दल खुलासा केला आहे. यात २०१८ मध्ये ४ वरिष्ठ न्यायाधीशांची झालेली पत्रकार परिषद, गोगोई यांच्यावर लावण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप ते त्यांच्या सर्वोच्च न्यायालयातल्या कार्यकाळाबद्दल अनेक गोष्टींचा उल्लेख आहे.

PM Narendra Modi
”नव्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलासाठी ८०० कोटी मंजूर”, मोदी म्हणाले, ”नवीन संसद भवनाप्रमाणे…”
Who is made indian constitution Ambedkar or Nehru
‘संविधान निर्मितीमध्ये आंबेडकरांपेक्षा नेहरुंचे श्रेय अधिक’, वाद उफाळल्यानंतर काँग्रेस नेत्याकडून पोस्ट डिलीट
13 Notice to central government on doctor plea
१३ डॉक्टरांच्या याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस
man commits suicide after wife sister in law asking money for liquor
पिंपरी : दारूसाठी पैसे मागणाऱ्या पत्नी, मेहुणीच्या त्रासाला कंटाळून देहूरोडमध्ये तरुणाची आत्महत्या

अयोध्या खटल्याचा निकाल सुनावल्यानंतरची संध्याकाळ आपल्यासाठी कशी होती, याबद्दल गोगोई लिहितात, “निकालानंतर, सरचिटणीसांनी अशोक चक्राच्या खाली न्यायालय क्रमांक १ च्या बाहेर न्यायाधीशांच्या गॅलरीत फोटो काढण्यासाठी बोलावलं होतं. संध्याकाळी मी खंडपीठाच्या सर्व न्यायाधीशांना ताज मानसिंग हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलो. आम्ही चायनीज फूड खाल्ले आणि तिथे असलेल्या सर्वोत्तम वाईनचा आस्वाद घेतला”.

तत्कालीन सरन्यायाधीश गोगोई यांच्या नेतृत्वाखालील, अयोध्येचा निकाल देणार्‍या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात तत्कालीन CJI-नियुक्त एस ए बोबडे आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस अब्दुल नझीर यांचा समावेश होता.न्यायमूर्ती अकिल कुरेशी यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याच्या शिफारशी मागे घेण्याच्या आणि त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती करण्याच्या कॉलेजियमच्या निर्णयावर, गोगोई लिहितात की तो निर्णय संवैधानिक संस्थांमधील संघर्ष टाळण्यासाठी महत्त्वाचा होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After ayodhya verdict took bench for dinner wine picked tab ex cji ranjan gogoi vsk

First published on: 09-12-2021 at 14:03 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×