पीटीआय, मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर मालदीवच्या मंत्र्याने त्यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळ उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, ‘भारतीय बेटांवर आणि किनाऱ्यांवरील स्थळांवर प्रवास करावा’, असे आवाहन चित्रपटसृष्टीतील सलमान खान, अक्षय कुमार व श्रद्धा कपूर यांच्यासह इतर तारे- तारकांनी रविवारी आपल्या चाहत्यांना केले.

अक्षय कुमार, क्रिकेटपटू हार्दिक पांडय़ा आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी मालदीवच्या मंत्र्याने केलेला शेरेबाजीचा निषेध केला आणि भारतीय पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे आवाहन लोकांना केले. इंटरनेट वापरकर्त्यांनी लक्षद्वीप आणि मालदीव ही प्रतिस्पर्धी पर्यटन स्थळे असल्याचा उल्लेख केला.‘मोदी हे लक्षद्वीपच्या स्वच्छ आणि अद्भुत किनाऱ्यांचा आनंद घेत असल्याचे पाहणे ‘कूल’ होते आणि सगळय़ात मोठी गोष्ट म्हणजे हे ठिकाण आमच्या भारतात आहे’, असे सलमान खान याने ‘एक्स’वर लिहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >>>“मालदीवमधील मंत्र्यांची भारतीयांबद्दल वर्णद्वेषी वक्तव्ये…”, अक्षय कुमारचा संताप; म्हणाला, “आता स्वाभिमान…”

लक्षद्वीप बेटांनी आपले मन जिंकले असल्याचे टायगर श्रॉफ म्हणाला. तर, श्रद्धा कपूर व इतर अभिनेत्यांनी ‘एक्स्प्लोअर इंडियन आयलंड्स’ आणि ‘लक्षद्वीप’ हे हॅशटॅग वापरून ‘एक्स’ वर पोस्ट सामायिक केल्या. नवीन वर्षांची सुरुवात कुटुंबासह मालदीवमध्ये केलेला अक्षय कुमारने मालदीवच्या मंत्र्याने केलेल्या ‘द्वेषपूर्ण आणि वंशवादी’ शेरेबाजीचा निषेध केला.