scorecardresearch

दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड; कराचीत इमर्जन्सी लँडिंग

दोन दिवसांपूर्वीच दिल्लीहून जबलपूर निघालेल्या स्पाईसजेट विमानात धुराचे लोट पसरल्यामुळे त्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते.

SpiceJet emergency landing In Karachi
स्पाईसजेट विमानात तांत्रिक बिघाड

दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे पाकिस्तानातील कराची येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असून काळजी करण्याची गरज नसल्याचे स्पाईसजेट कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विेमानाच्या इंडिकेटरमध्ये बिघाड

स्पाइसजेट B737 विमान दिल्लीहून दुबईला चालले होते. मात्र, अचनाक विमानाच्या इंडिकेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाकिस्तानातील कराची विमानतळावर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमानात या अगोदर कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड नव्हता मात्र, अचानक विमानाच्या इंडिकेटरमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. विमानातील एकूण १५० पेक्षा अधिक प्रवासी होते. इमर्जन्सी लँडिंगनंतर प्रवाश्यांना सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आले असून लवकच त्यांना दुसऱ्या विमानाने दुबई नेण्याची सोय करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

तीन दिवसांतील दुसरी घटना
तीन दिवसांपूर्वीच दिल्लीहून जबलपूर निघालेल्या स्पाईसजेट विमानाला उड्डाणानंतर काहीच वेळातच पुन्हा खाली उतरवण्यात आले होते. उड्डाणानंतर विमानात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे दिल्ली विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. गेल्या तीन दिवसात दोन स्पाईसजेट विमानाचे तांत्रिक अडचणींमुळे इमर्जन्सी लँडिंग कराव्या लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कंपनीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After technical fault spicejet delhi dubai flight makes emergency landing in karachi dpj

ताज्या बातम्या