राजकारणामुळे बिहार राज्य विकासात मागे राहिले आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला अगोदर घोषित केलेल्या ५० हजार कोटींपेक्षाही जास्त रकमेची मदत लगेच देण्यात येईल, अशी घोषणा बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना केली.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपपासून फारकत घेतल्यानंतरही ते आज मोदी यांच्यासमवेत मंचावर उपस्थित होते. मोदी यांनी जनता दल संयुक्तचे नवे भागीदार असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यांनी बिहारचा विकास रोखला. राजकारणामुळे बिहारचे किती नुकसान झाले याचा लेखाजोखा मोदी यांनी मांडला.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2015 रोजी प्रकाशित
‘बिहारला ५० हजार कोटींपेक्षा अधिक मदत’
राजकारणामुळे बिहार राज्य विकासात मागे राहिले आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला अगोदर घोषित केलेल्या ५० हजार कोटींपेक्षाही जास्त रकमेची मदत लगेच देण्यात येईल
First published on: 26-07-2015 at 08:33 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aid to bihar 50 cr