केंद्र सरकारने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील माहितीपटावर बंदी घातली. यावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “मोदींनी गुजरात दंगलीवरील माहितीपटावर बंदी घातली, मग महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेवरील चित्रपटावरही बंदी घालणार का?” असा प्रश्न असुदुद्दीन ओवैसी यांनी विचारला. एमआयएमने एका सभेतील ओवैसींच्या भाषणाचा एक व्हिडीओ ट्वीट केला. यात त्यांनी हे मत व्यक्त केलं.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “बीबीसीने गुजरात दंगलीवर तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. मोदी सरकारने इंग्रजांनी बनवलेल्या कायद्याचा वापर करून ती मुलाखत भारतात युट्यूबसह सोशल मीडियावर बॅन केली. गुजरात दंगलीच्यावेळी गुजरातमध्ये मोदींचं सरकार नव्हतं, बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार झाला तेव्हा मोदी सत्तेत नव्हते. हे सर्व दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या व्यक्तीने केलं आहे, असं मानू.”

mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
Amit Shah claims that there is no encroachment of even an inch by China
चीनकडून एका इंचावरही अतिक्रमण नाही; अमित शहा यांचा दावा; पहिले पंतप्रधान नेहरूंवर टीकास्त्र

“गुजरात दंगलीत काँग्रेस खासदारांच्या शरीराचे सहा तुकडे करून हत्या”

“गुजरात दंगलीत काँग्रेस खासदारांच्या शरीराचे सहा तुकडे करून हत्या करण्यात आली आणि जाळून टाकण्यात आलं. त्यांना काँग्रेसचा एक नेता जाऊन भेटला नाही. त्या काँग्रेस खासदारांची हत्याही मोदींच्या काळात झाली नाही, तर अंतराळातून काही माणसं येऊन ते करून रॉकेटमध्ये बसून परत गेले. गुजरात दंगलीत मोदी नव्हते म्हणून त्यांनी बीबीसीची ती मुलाखत बॅन केली, असं मानू,” असा खोचक टोला असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला.

“महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेबाबत मोदींचं मत काय?”

ओवैसी पुढे म्हणाले, “आता मला मोदी आणि भाजपाला प्रश्न विचारायचा आहे की, गुजरात दंगलीवरील मोदींच्या मुलाखतीवर बंदी घातली, आता महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेबाबत मोदींचं मत काय आहे ते त्यांनी सांगावं. नथुराम गोडसे गांधींचा हत्यारा आहे. त्याने ३० जानेवारीला गांधींना गोळ्या झाडून हत्या केली. आता हा दिवसही येतो आहे. काँग्रेसचे नेते म्हणाले २६ जानेवारीला गांधींची हत्या केली. ‘क्या बात हैं प्यारे’. ते म्हणाले की, मी कुठंतरी वाचलं, तर ठीक आहे वाचलं असेल.”

“मोदी आणि भाजपा गोडसे मुर्दाबाद म्हणणार की नाही?”

“गोडसेने ३० जानेवारीला गांधींची हत्या केली. मग भारतातला सर्वात पहिला दहशतवादी कोण आहे? स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसे आहे. मग मोदी आणि भाजपा गोडसे मुर्दाबाद म्हणणार की नाही? आता गोडसेवर चित्रपट बनत आहेत. त्यामुळे आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेवरील चित्रपटावर बंदी घालणार की नाही?” असा थेट सवाल ओवैसी यांनी मोदी आणि भाजपाला विचारला.

“गांधींची हत्या करणाऱ्याच्या चित्रपटावर भारतात बंदी घालणार का?”

“मोदी नथुराम गोडसेवरील चित्रपटावर बंदी घालणार की जनतेला जाऊन चित्रपट पाहण्यास सांगणार आहेत? त्या चित्रपटात गोडसेने गांधींना का मारलं असं सांगितलं जात आहे. मोदी आणि भाजपाला त्यांच्याविषयी बीबीसीने काही दाखवलं तर मिर्च्या झोंबल्या. मग आता गांधींची हत्या करणाऱ्याचा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार की बंदी घालणार का?” असा प्रश्न ओवैसी यांनी विचारला.

हेही वाचा : “…तेव्हा तुम्ही कोणता धडा शिकवलात?”, असदुद्दीन ओवैसींचा अमित शाहांना संतप्त सवाल, बिल्किस बानो प्रकरणावरुन सुनावले खडेबोल

“नरेंद्र मोदी महात्मा गांधींपेक्षा मोठे नाहीत”

“नरेंद्र मोदी महात्मा गांधींपेक्षा मोठे नाहीत. गांधी-आंबेडकरांपेक्षा कोणीही मोठा होऊ शकत नाही. गांधींना मारणाऱ्यावर चित्रपट तयार होत आहे, तर त्यावर मोदी आणि भाजपाने बंदी घालावी,” असंही त्यांनी नमूद केलं.