AIMIM च्या प्रवक्त्याचं शिवलिंगाबाबत वादग्रस्त विधान, सायबर पोलिसांनी केलं जेरबंद

AIMIM चे प्रवक्ते दानिश कुरेशी यांनी शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून ज्ञानवापी मशीद प्रकरणावरून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. अलीकडेच ज्ञानवापी मशिदीत केलेल्या सर्वेक्षणामध्ये शिवलिंग आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. असं असताना AIMIM चे प्रवक्ते दानिश कुरेशी यांनी शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. संबंधित ट्विटमधून त्यांनी हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी दानिश कुरेशीला शाहपूर येथून अटक केली आहे. पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

याप्रकरणी अधिक माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त जेएम यादव यांनी सांगितलं की, दानिश कुरेशी नावाच्या ट्विटर हॅंडलवरून आक्षेपार्ह ट्वीट करण्यात आलं होतं. यामधून बहुसंख्याक लोकांच्या धार्मिक भावना दुखवल्या होत्या. त्यानंतर पोलीस पथकानं तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत दानिश कुरेशी याला अटक केली आहे.

खरंतर, ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आढळल्यानंतर AIMIM चे प्रवक्ते दानिश कुरेशी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून वादग्रस्त मजकूर ट्वीट केला होता. यावेळी त्यांनी शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह भाष्य देखील केलं होतं. त्यानंतर अनेक हिंदू धर्मातील लोकांनी धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारी केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला. दानिश कुरेशी शाहपूरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शाहपूरमध्ये जाऊन दानिश कुरेशीला अटक केली आहे.

दानिश कुरेशी याच्याविरोधात नरोडा आणि पालडी पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्याविरोधात धार्मिक सलोखा बिघडवणे, अशांतता निर्माण करणे, धार्मिक तेढ निर्माण करणे अशा विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aimim spokesperson danish qureshi controversial statement about shivlinga arrested by cyber police rmm

Next Story
दिल्लीच्या उप राज्यपालांचा तडकाफडकी राजीनामा, ‘या’ कारणामुळे सोडलं पद
फोटो गॅलरी