एआययूडीएफचे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. या वेळी त्यांनी लहान वयात मुलींचं लग्न व्हायला हवं, असं म्हटलं आहे. हिंदूंनी आपल्या मुलींचं लग्न १८ ते २० वर्षात केलं पाहिजे आणि त्यांनी मुस्लिमांचा फॉर्म्युला पाळला पाहिजे, असा अजब सल्ला दिला आहे. ते आसाममधील करीमगंज येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बद्रुद्दीन अजमल म्हणाले की, “मुलीचं वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यास तिच्या लग्नाला सरकारने परवानगी दिली आहे. ते (हिंदू) लोक ४० वर्षांपर्यंत लग्न करत नाहीत. या काळात दोन-तीन बेकायदेशीर बायका ठेवतात. त्यांना मुलं होऊ देत नाहीत. ते आपला खर्च वाचवतात. एकप्रकारे ते चेष्टा करतात. ४० वर्षानंतर आई-वडिलांनी लग्नासाठी प्रवृत्त केलं किंवा ते कुठे अडकले तर ते लग्न करतात.”

हेही वाचा- आसाम: ईदीला हिंदूंसाठी मातेसमान गायींचा बळी देऊ नका, बद्रुद्दिन अजमलांचे मुस्लिमांना आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पण ४० वर्षानंतर मूल जन्माला घालायची त्यांच्यात क्षमता कुठे राहते? तेथून पुढे मूल जन्माला घालायचं आणि त्याला वाढवायचं, अशी आशा ते कसं काय ठेवू शकतात? योग्य वयात लग्न झाल्यास सर्व गोष्टी योग्य होऊ शकतात. त्यामुळे मुस्लिमांचा हा फॉर्म्युला तुम्हीही मान्य करायला हवा. आपल्या मुलाचं लग्न २० ते २२ वर्षात आणि मुलीचं लग्न १८ ते २० वर्षात करावं, मग बघा तुमच्यातही अनेक मुलं जन्म येतील” असं विधान बद्रुद्दीन अजमल यांनी केलं आहे.