ऑनलाइन माध्यमातून गांजा पुरवल्याबद्दल अ‍ॅमेझॉनच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातल्या पोलिसांनी १४ नोव्हेंबर रोजी दोघांना २० किलो गांजासह ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हे लोक अ‍ॅमेझॉन वेबसाईटचा वापर गांजा खरेदी आणि पुरवठा करण्यासाठी करत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या निवेदनात मध्यप्रदेश पोलिसांनी म्हटलं आहे की अ‍ॅमेझॉन इंडियाच्या काही कार्यकारी संचालकांवर NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी कंपनीकडे केली असता त्यांनी सादर केलेली कागदपत्रं आणि दिलेली उत्तरं यात तफावत आढळून आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon india sold 1000 kg marijuana executives accused of smuggling vsk
First published on: 21-11-2021 at 12:30 IST