अ‍ॅमेझॉन कंपनीने भारतासह जागतिक स्तरावर नोकर कपात करण्यास सुरुवात केली आहे. कंपनी भारतातील किती कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढणार आहे, याची स्पष्टपणे माहिती दिली नाही. मात्र देशातील एक टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढण्याची शक्यता असल्याची माहिती समजत आहे. खरं तर, अ‍ॅमेझॉन कंपनीत सुमारे एक लाख भारतीय लोक काम करतात. यातील एक टक्के म्हणजेच एक हजार जणांची नोकरी जाण्याची शक्यता आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढलं जाणार आहे, याची माहिती कंपनीकडून ईमेलद्वारे देण्यास सुरुवात झाली आहे. पुढील आणखी दोन दिवस ही प्रक्रिया चालणार असल्याचं सांगितलं जातं आहे. ज्या लोकांना नोकरीतून काढण्यात आलं, ते लोक नोकरीच्या नवीन संधी शोधत आहेत.

SAI recruitment 2024 job post
SAI recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी! मिळणार ‘इतक्या’ लाखांचा पगार…
What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?

गुरुग्राम येथील रहिवाशी असलेल्या ओमप्रकाश शर्मा यांनाही नोकर कपातचा फटका बसला आहे. ते अ‍ॅमेझॉन कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत होते. मागील पाच वर्षांपासून ते येथे काम करत होते. ११ जानेवारी रोजी शर्मा यांना कामावरून काढून टाकण्यात आलं. यानंतर शर्मा यांनी नोकरीची नवीन संधी शोधत असल्याची माहिती लिंक्डइनवर दिली. काही महिन्यांपूर्वी वडिलांचं निधन झालं आणि आता नोकरी गमावली आहे, अशी माहिती शर्मा यांनी दिली.

हेही वाचा-ट्विटर, मेटानंतर गुगलही नोकर कपातीच्या मार्गावर, इतक्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार

त्यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये लिहिलं की, “२०२२ हे माझ्या आयुष्यातील सर्वाधिक आव्हानात्मक वर्ष होतं. या वर्षात प्रथम मी माझ्या वडिलांना गमावलं. तत्पूर्वी त्यांना दोन ते तीन महिने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे मी जवळपास चार महिने नोकरीवर जाऊ शकलो नाही. आता ११ जानेवारी रोजी, अ‍ॅमेझॉन कंपनीने नोकर कपात करत असताना मलाही कामावरून काढलं आहे,” असं शर्मा यांनी आपल्या लिंक्डइन पोस्टमध्ये लिहिलं.