Amazon Charge Marketplace Fee On Customer Order : आपण सगळेच जण सध्या ऑनलाईन शॉपिंगवर अवलंबून असतो. एखादी गोष्ट मार्केटमध्ये जाऊन आणायचा कंटाळा आला, रीलमध्ये एखादी उपयोगी वस्तू बघितल्यावर, तर कधी मार्केटमध्ये मनासारखा ड्रेस नाही मिळाला की, आपण थेट फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनवर जाऊन ती वस्तू शोधतो आणि खरेदी करतो. पण, आता ॲमेझॉनने सर्वकॅग ग्राहकांसाठी एक नवीन नियम सादर केला आहे; जे वाचून छोट्या-छोट्या गोष्टींसाठी खरेदी करताना तुम्हाला विचार करावा लागणार आहे.

ॲमेझॉन इंडिया ग्राहकांच्या प्रत्येक ऑर्डरवर ५ रुपये मार्केटप्लेस फी लागू करणार आहेत. लाखो विक्रेत्यांना उत्पादने प्रदान करत असताना प्लॅटफॉर्मच्या ऑपरेशनल खर्चाला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. सर्व ग्राहकांना लागू होणारी ही फी खरेदी अनुभव प्रदान करण्याच्या अमेझॉनच्या वचनबद्धतेला समर्थन देते; असे कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे. जागतिक ई-कॉमर्स पद्धतींमध्ये मार्केटप्लेस फी सामान्य असली तरीही हे पाऊल प्राइम सदस्यांसह भारतीय प्रत्येक ग्राहकांसाठी एक लक्षणीय बदल दर्शवणार आहे. झोमॅटो आणि स्विगी या कंपन्या सुद्धा गेल्या काही काळापासून ग्राहकांसाठी असेच समान शुल्क आकारत आहेत.

मार्केटप्लेस फी म्हणजे काय (What Is Marketplace Fee)

Amazon.in वर दिलेल्या प्रत्येक ऑर्डरवर मार्केटप्लेस फी ५ रुपये आकारली जाणार आहे. कंपनीच्या मते, ही फी त्यांच्या विक्रेत्यांच्या इकोसिस्टम आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा राखण्यास मदत करते. एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर चेकआउट दरम्यान ते एक स्वतंत्र आयटम म्हणून दिसेल, ज्यामुळे ग्राहकांसाठी पारदर्शकता सुनिश्चित होईल.

ॲमेझॉनवरून कोणती गोष्ट खरेदी केल्यास या शुल्कातून तुम्हाला सूट मिळेल (Is anything on Amazon exempt from this fee)

तर सर्व व्यवहारांवर हे शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे पुढील गोष्टींवर तुम्हाला सूट मिळेल.

  • गिफ्ट कार्ड खरेदी (फिजिकल आणि डिजिटल).
  • अमेझॉन बिझनेस, बाजार, अमेझॉन नाऊ आणि अमेझॉन फ्रेश द्वारे ऑर्डर.
  • रिचार्ज, बिल पेमेंट, तिकीट बुकिंग आणि सबस्क्रिप्शन सारख्या डिजिटल सेवा.
  • एक्सचेंज शुल्क आधीच लागू असलेल्या ऑर्डर.

तसेच डिलिव्हरीच्या वेळी पैसे भरताना तुम्हाला ही फी दिसणार नाही; जोपर्यंत कंपनीचे नियम बदलत नाहीत.

प्राइम सदस्यांसाठी हा नियम असणार का?

होय. प्राइम ग्राहकांना सुद्धा मार्केटप्लेस फी शुल्कातून सूट नाही. मार्केटप्लेस फी सर्व युजर्सना समान प्रमाणात लागू होते, मग तो कोणताही ग्राहक असो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑर्डर परत देण्यासाठी नियम कसे असतील?

  • मार्केटप्लेस फी परतफेड, ऑर्डरचा किती भाग रद्द केला जातो, नाकारला जातो किंवा परत केला जातो यावर अवलंबून असतात. ब्लॉग पोस्टमध्ये, Amazon ने परतफेड धोरणाची सविस्तर माहिती दिली आहे ती पुढीलप्रमाणे…
  • शिपिंगपूर्वी ऑर्डर रद्द केल्यास शुल्क प्रमाणानुसार परत केले जातील.
  • पार्शिअल कॅन्सलेशन बिफोर शिपिंग : शुल्क प्रमाणानुसार परत केले जाते किंवा ऑर्डर पूर्ण न रद्द करता, पाठवण्यापूर्वी त्यातील काही वस्तू रद्द केल्या जातील
  • फूल डूअर स्टेप रिजेक्शन : पूर्णपणे परतावा मिळेल.
  • डिलिव्हरीनंतर परतफेड: पूर्ण परतफेड करूनही शुल्क परत मिळणार नाही.

तुम्हाला मार्केटप्लेस शुल्क कुठे दिसेल?

  • पेमेंट करण्यापूर्वी ऑर्डर summary पेजवर.
  • तुमच्या ऑर्डर कन्फर्मेशन आणि शिपमेंट ईमेलमध्ये.
  • तुमच्या ऑर्डर’ द्वारे डाउनलोड करण्यायोग्य इनव्हॉइसवर

काही जणांना ५ रुपये शुल्लक वाटू शकतात. पण, वारंवार खरेदी करणाऱ्यांसाठी कदाचित ॲमेझॉनने हे पाऊल उचलले आहे.